मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार याच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन करत, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी एका महिलेवर वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
आशिष शेलार हे मंगळवारी विलेपार्ले येथे महत्वाच्या बैठकीसाठी जात असताना वांद्रे वाहतूक पोलिस चौकीजवळ ही घटना घडली. शेलार यांचा ताफा सिग्नलहून जात असताना, सिग्नल लाल झाला होता. मात्र ताफ्यात गाडी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ताफ्यातील गाडीने सिग्नलचं पालन केलं नाही. यावेळी सुरक्षेतील गाडीने एका दुचाकीला धडक दिली. ही दुचाकी एक महिला चालवत होती.
हे ही वाचा:
धर्मांतरणाचा तगादा लावणाऱ्या तरुणाने फेकले तरुणीला चौथ्या मजल्यावरून खाली
जी २० शिखर परिषदेची जबाबदारी आता भारताकडे
तिकीट ‘मिळवून’ देणाऱ्या ‘आप’च्या आमदार मेहुण्याच्या मुसक्या आवळल्या
१५ दिवसांपूर्वीच आफताबचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले होते
यावरून झालेल्या वादातून महिला पूनम पाटील हिने शेलार यांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत, मारहाण करत ताफ्यातील सुरक्षेची गाडी अडवून धरली. या प्रकरणी महिलेवर वांद्रे पोलिसात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम 353,332,50 4,427 भादवि अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या महिलेला ताब्यात घेऊन तिला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले आहे.
आशीष शेलार हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे.