31 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरविशेषगाझियाबादमध्ये चमत्कार! वीज पडलेल्या शेतातील खड्ड्यात सापडले 'शिवलिंग'

गाझियाबादमध्ये चमत्कार! वीज पडलेल्या शेतातील खड्ड्यात सापडले ‘शिवलिंग’

दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक चमत्कारीत घटना समोर आली आहे. पावसात वीज पडल्याने शेतात खड्डा तयार झाला आणि त्या खड्ड्यात शिवलिंग आढळून आले आहे. शिवलिंगाची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर लोक त्या ठिकाणी पूजा करू लागले  आहेत आणि ते एक दैवी घटना मानत आहेत.

ही घटना गाझियाबादमधील मसुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुबारिकपूर डासना परिसरातील गावातील आहे. वीज पडल्याने शेतात आपोआपच ८-१० फूट खोल खड्डा तयार झाला. हा खड्डा पाहण्यासाठी लोक आले असता त्यांनी जे पाहिले ते पाहून आश्चर्यचकित झाले. खड्ड्याच्या आत शिवलिंग दिसत होते. यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले.

हे ही वाचा : 

धक्कादायक! मालेगावात १,००० रोहिंग्या, बांगलादेशींना दिले जन्म दाखले!

देशभरात शोककळा अन राहुल गांधींचा नववर्ष साजरा करण्यासाठी परदेश दौरा!

तालिबानी फतवा; महिला दिसू नयेत म्हणून खिडक्याच नकोत!

केजरीवालांकडून आता पुजाऱ्यांना साद; दरमहा मिळणार १८,००० रुपये

गावातील लोकांचा असा विश्वास आहे की, ही एक दैवी घटना आहे ज्यामध्ये शिवलिंग प्रकट झाले आहे. मुबारिकपूर गावातील रहिवासी असलेल्या संजीवने सांगितले की, तो चारा घेण्यासाठी त्याच्या शेतात आला होता, यावेळी शेतातील खड्ड्यात शिवलिंग दिसले.द

लोकांनी शेतातून शिवलिंग बाहेर काढले, त्याची पूजा केली आणि जवळच्या मंदिरात त्याची स्थापना केली. आता लोक इथे शिवमंदिर बांधण्याबाबत बोलत आहेत. लोक म्हणतात की, शेतात स्वतःच खड्डा तयार झाला होता. शिवलिंगात तीन ओळींचे त्रिपुंड चिन्ह आहे. शेतातील खड्ड्यात शिवलिंग सापडल्याने येथील लोक खूप उत्साहित झाले आहेत. जयघोषासोबतच जवळच्या मंदिरात महिलांकडून भजन, कीर्तन केले जात आहे. लोक इथे मंदिर बांधण्याबाबत बोलत आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी आपली शेतजमीन देणार असल्याचे शेतमालकाचे म्हणणे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा