भारतीय वेटलिफ्टिंगची ‘आयरन लेडी’ आणि टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती मीराबाई चानू हिने मनगटाच्या दुखापतीनंतरही ८७ किलो वजन उचलले. जुरी आणि तांत्रिक अधिकारी देखील त्यांच्या डोळ्यांसमोर जे काही घडत होते यावर विश्वास बसत नव्हता.
ती महिलांच्या ४९ किलो गटातील ८७ किलो वजन उचलण्यासाठी अत्यंत अशक्य स्थितीतून जात होती . मीराबाई लीडरबोर्डवर ११-महिलांच्या अंतिम फेरीत पाचव्या स्थानावर होती . मीराबाईनी तिच्या सर्व आंतरिक शक्तीने ८७ किलो वजन सहज पेलले. ८७ वजन उचलून ती दुसऱ्या फेरीसाठी सज्ज झाल्या. स्नॅचमध्ये तिने ८७ किलो वजन उचलले आणि नंतर क्लिन अँड जर्कमध्ये उचललेल्या ११३ किलो वजनामुळे एकूण २०० किलो वजनासह तिला रौप्यपदक मिळाले. हे वजन उचलून त्यांनी भारताला अजून एक रौप्यपदक जिंकवून दिले. मीराबाईला हे पदक जिंकण्यासाठी ५ वर्षं लागली.
हे ही वाचा :
मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास; पण ‘आप’ला जनतेने त्यांना पूर्ण नाकारले
आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका
…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली
“पाच वर्षांनंतर मायदेशात दुसरे विश्व चॅम्पियनशिप पदक परत आणणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मला मनगटात दुखत होते पण मी देशासाठी माझ्या क्षमताही ओलांडण्याची तयारी करते, . मला आशा आहे की मी भारताला असे अनेक आनंदाचे क्षण देऊ शकेन” मीराबाई म्हणाल्या. “मनगटाच्या समस्येमुळे तिच्यासाठी हे थोडे आव्हानात्मक होते. पण तिने अव्वल खेळाडूंना पराभूत केले आणि २०० किलो इतके सहजतेने उचलले. मीराला पाहून, मला विश्वास आहे की आम्ही योग्य मार्गावर आहोत आणि ती निश्चितपणे आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकमध्ये पदक आणण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करेल ,” मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा म्हणाले.