…म्हणून मीराबाई चानूला आयुष्यभर मिळणार मोफत पिझ्झा

…म्हणून मीराबाई चानूला आयुष्यभर मिळणार मोफत पिझ्झा

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकांच्या यादीत शिरकाव केला आहे. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिने पदक पटकावत भारताचे खाते उघडले. मीराबाईच्या या कामगिरीसाठी तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर याच कामगिरीसाठी मीराबाईला आयुष्यभर मोफत इच्छा देणार असल्याचे डोमिनोज या आघाडीच्या पिझ्झा आउटलेटने जाहीर केले आहे.

मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. तिच्या या कामगिरीनंतर एनडीटीव्ही या वृत्त वहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मीराबाई चानू हिने तिची पिझ्झा खाण्याची इच्छा बोलून दाखवली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खूप कडक असे डाएट पाळावे लागते. त्यांचे खाण्यापिण्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे लागते. त्यामुळे पिझ्झा सारखे पदार्थ त्यांना खाणे शक्य नसते. पण आता पदकाचे ध्येय साद्ध्य केल्यानंतर आता आवडते पदार्थ खाण्याला मुभा आहे. त्यामुळेच मीराबाई चानू हिने आपली पिझ्झा खाण्याची इच्छा बोलून दाखवली.

हे ही वाचा:

लसीच्या २ डोस नंतर अजून एक डोस?

कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?

गाडी चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात

‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार

यावरूनच डॉमिनोज या विश्वविख्यात पिझ्झा आउटलेटच्या भारतातील शाखेने मीराबाई चानू हिला आयुष्यभरासाठी मोफत पिझ्झा मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली. मीराबाई यांनी पिझ्झासाठी थांबून राहावे असे आम्हाला वाटत नाही. आम्ही मीराबाई चानू हिला आयुष्यभर मोफत पिझ्झा देऊ अशी घोषणा डॉमिनोजने केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी मीराबाई चानू हिच्या मणिपूर येथील घरी जाऊन तिच्या कुटुंबियांना पिझ्झा पोहोचवला आहे.

Exit mobile version