29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषमीराबाईने साऱ्या जगाला दाखवून दिले भारतीय संस्कार

मीराबाईने साऱ्या जगाला दाखवून दिले भारतीय संस्कार

Google News Follow

Related

वेटलिफ्टिंग मध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देत साऱ्या देशाची मान उंचावली आहे. ही कामगिरी करत असतानाच मीराबाई हिने आपल्या अनोख्या अंदाजात साऱ्या जगाला भारतीय संस्कृती म्हणजे नेमके काय याची ओळख पुन्हा एकदा पटवून दिली. मीराबाई हिच्या प्रत्येक कृतीतून अस्सल भारतीयत्व झळकताना दिसले. याचा भारतीयांना अभिमान वाटलाच पण सार्‍या जगाला ही त्याची मोहिनी पडली असेल यात शंका नाही.

ऑलिम्पिकमध्ये ‘वजनदार’ कामगिरी करत रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू हीचा जन्म मणिपूरमधील एका सामान्य कुटुंबात झाला. मणीपूर हे राज्य पहिल्यापासूनच तसे मागास. लहानपणी घरी लाकडे जमा करून आणताना मीराबाईच्या कुटुंबीयांना तिच्यातील ताकदीची पहिल्यांदा जाणीव झाली. इथूनच पुढे मीराबाईचा वेटलिफ्टर म्हणून प्रवास सुरू झाला आणि जो अजूनही संपलेला नाही.

हे ही वाचा:

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

मीराबाई चानूने रौप्य पदक ‘उचलले’

ठाकरे सरकारच्या या चुकीला माफी नाही!

संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे कसले पालक मंत्री? हे तर पळपुटे मंत्री!

मीराबाई जेव्हा टोकियो ऑल्मिपिकसाठी रवाना झाली तेव्हा सर्वांनाच तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. ऑलिम्पिक स्पर्धेत जेव्हा मीराबाई स्पर्धक म्हणून उतरली तेव्हा तिच्या अनोख्या अंदाजाने सरेच प्रभावित झाले. जेव्हा जेव्हा ती वजन उचलण्यासाठी यायची तेव्हा सर्वात आधी त्या वजनाला नमस्कार करायची. मग ते वजन उचलून खाली ठेवल्यावर पुन्हा उपस्थित सर्व पंच, प्रेक्षक आणि इतर उपस्थितांना हात जोडून अभिवादन करताना दिसली.

वेटलिफ्टिंगच्या ज्या प्रयत्नात मीराबाई अयशस्वी ठरली तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य दिसून आले. तेव्हाही ती सर्वांना अभिवादन करताना दिसली. कुठेच नकारात्मक भाव किंवा निराशा जाणवली नाही. तिचा हा स्वभाव साऱ्यांचे मन जिंकून गेला. जेव्हा तिचे सुवर्णपदक हुकले तेव्हा देखील ती निराश नव्हती. उलट तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. रौप्य पदकावर शिक्कामोर्तब झाल्यावर काही वेळाने तर मीराबाई तिच्या प्रशिक्षकांच्या समवेत भांगडा नाचत आनंद साजरा करताना दिसून आली. तिच्या या प्रत्येक कृतीतून तिच्या कणाकणात वसणारा भारत आणि भारतीय संस्कार दिसत होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा