राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी उत्सवात काय म्हणाली होती मिराबाई चानू?

राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी उत्सवात काय म्हणाली होती मिराबाई चानू?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकाचे खाते उघडून देणारी वेटलिफ्टर मिराबाई चानू दोन वर्षांपूर्वी नागपूर येथे राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी सोहळ्यात उपस्थित राहिली होती.

त्यावेळी भाषण करताना तिने म्हटले होते की, मी खेळण्यासाठी जिथे जाईन तिथे मी मिराबाई नाही, भारत आहे. प्रत्येक ठिकाणी माझ्या मनात भारतच असतो. राष्ट्रसेविका समितीच्या वरिष्ठ पदाधिकारी सुनीतादिदी हळदेकर यांनी ही माहिती दिली.

मिराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक विजेती कामगिरी केली. भारताचे वेटलिफ्टिंगमधील ऑलिम्पिकचे हे पहिलेच रौप्य ठरले. त्यामुळे मिराबाईचे विशेष कौतुक होते.

हळदेकर म्हणाल्या की, राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमीच्या उत्सवात २०१८मध्ये मिराबाई चानू आली होती. हा कार्यक्रम नागूपरला झाला होता. थोबाल जिल्हयात मिराबाईचे घर आहे. तिथे जाऊन मी तिच्याशी बोलले होते.

विजयादशमी उत्सवात  बोलताना चानू म्हणाली होती की, क्रीडाजगतात असल्यामुळे माझ्याकडे वक्तृत्व नाही. राष्ट्रसेवा समिती ही देशभक्ती निर्माण करणारी संघटना आहे. समितीचे कार्य पाहून मी प्रभावित झाले आहे. मी जेव्हा खेळण्यासाठी विविध ठिकाणी जाते तिथे माझ्या मनात भारत असतो. तिथे मी मिराबाई नाही, तर भारत आहे.

हे ही वाचा:
कोकणासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तळियेला जाणार

लोकहित जोपासण्याचा शिवसेनेशी संबंध काय?

एवढा ‘ज्यू द्वेष’ की ऑलिम्पिकचंही महत्व नाही

मिराबाई चानू ही जेव्हा स्पर्धेला जाते तेव्हा भारतातील तांदूळ घेऊन तिथे जाते. तेव्हा एका स्पर्धेदरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तिला विचारले होते की, जेवणासाठी सगळे खेळाडू एकत्र बसले असताना तू का आली नाहीस?  तेव्हा ती म्हणाली होती की, मी भारतातून तांदूळ घेऊन येते. तेव्हा राष्ट्राध्यक्षांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तेव्हा ती म्हणाली होती की, या तांदुळात जी सात्विकता आहे, ती अन्यत्र कुठे मिळणार नाही, त्यामुळे मी हा तांदूळ सोबत घेऊन जाते.

Exit mobile version