वक्फच्या अस्तित्वाआधी बांधलेल्या दिल्लीतील मंदिरांच्या जमिनीवरही आता डोळा!

वक्फच्या अस्तित्वाआधी बांधलेल्या दिल्लीतील मंदिरांच्या जमिनीवरही आता डोळा!

वक्फ बोर्डाकडून विविध ठिकाणी जमिनी हडप केल्या जात असल्याच्या आरोपांची चर्चा देशभरात सुरू असताना आता दिल्लीतील ६ मंदिरे ही वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. २०१९ मध्ये अल्पसंख्याक बोर्डाने एक सत्यशोधक अहवाल सादर केला होता. हा अहवाल आता चर्चेचा विषय बनला आहे. त्यात दिल्लीतील सहा मंदिरे ही वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे संताप व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही मंदिरे वक्फ बोर्डची स्थापना होण्याच्या आधीपासूनची आहेत. त्यामुळे नेमका दावा कुणाचा खरा याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वक्फ बोर्डाकडून अशापद्धतीने विविध जमिनी या आपल्याच आहेत असे दावे ठोकत त्या जमिनींवर ताबा सांगण्यात येत आहे. त्यातूनच या कायद्यात बदल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. संयुक्त संसदीय समितीकडे सध्या हे प्रकरण आहे. त्यांच्याकडे १ कोटी सूचनाही आल्या आहेत. आता या मंदिरांच्या बाबत योग्य कागदपत्रे दाखविणे आवश्यक आहे. पण वक्फ बोर्डाकडून आपल्या अधिकारांचा गैरवापर केला जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.

हे ही वाचा:

एफएटीएफने भारताच्या दहशतवाद विरोधी प्रयत्नांचे केले कौतुक, गंभीर धोक्याचा इशाराही दिला!

अरेच्चा! बघता बघता ट्रकला रस्त्याने गिळले

तिरुपती लाडू प्रकरण पोहोचले केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे

आता दंगल केलीत तर भरून द्या! उत्तराखंडमध्ये कायदा

२०१९च्या या अहवालात असा दावा करण्यात आला की, दिल्लीतील अनेक मंदिरे ही वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधण्यात आली आहेत. या अहवालाच्या १५९ क्रमांकाच्या पानावर असा दावा करण्यात आला आहे की, दिल्लीतील बीके दत्त कॉलनीतील सनातन धर्म मंदिर हे वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात हे मंदिर १४ डिसेंबर १९६१मध्ये बांधण्यात आले आहे. त्यावेळी वक्फ बोर्ड अस्तित्वातच नव्हते. वक्फ बोर्ड अस्तित्वात येण्याच्या ३४ वर्षे आधी हे मंदिर उभे राहिले आहे.

अशाच पद्धतीने अल्पसंख्याक आयोगाच्या या अहवालाच्या ३५ क्रमांक पानावर असा दावा करण्यात आला आहे की, मंगलापुरीमध्ये असलेले शिव मंदिर आणि स्मशान हेदेखील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधण्यात आले आहे. ३६ क्रमांकाच्या पानावर असा दावा आहे की, मंगलापुरी येथील शिवशक्ती काली माता मंदिरही वक्फच्या जमिनीवर बांधण्यात आले आहेत. पण ही मंदिरे वक्फ बोर्ड अस्तित्वात येण्याआधीची असल्यामुळे सगळ्यांनी या अहवालाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

Exit mobile version