केंद्रातील मंत्र्यांची भारतीय लसीला पसंती

केंद्रातील मंत्र्यांची भारतीय लसीला पसंती

पंतप्रधानांनी लस घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळातील विविध मंत्र्यांनी लस घ्यायला सुरूवात केली आहे. मात्र मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची ऍस्ट्राझेनेका लसीपेक्षा भारतीय बनावटीच्या कोविड-१९ वरीला लसीला पसंती दिली आहे.

हे ही वाचा:

“जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणं बंद करा” – चित्रा वाघ

भारताच्या आरोग्यमंत्री, परराष्ट्र आणि कायदेमंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल यांनी देखील आपली संधी आल्यानंतर लस घ्यायला सुरूवात केली आहे. या सर्वांनी विवादीत राहिलेल्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला पाठिंबा दर्शवण्यासाठी या ट्वीट्स देखील केले आहेत.

भारताचे आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्वीट केले की, भारतीय बनावटीची लस १०० टक्के सुरक्षित आहे.

काही सरकारी अधिकारी आणि डॉक्टरांनी कोवॅक्सिन लसीची परिणामकारकता सिद्ध होण्यापूर्वी ही लस घ्यायला नकार दिला होता. मात्र भारत बायोटेकने अंतिम टप्प्यातील चाचणी पूर्ण केल्यानंतर या लसीची परिणामकारकता सिद्ध केली आहे.

हे ही वाचा:

भारतीय लस ब्रिटिश लसीपेक्षाही जास्त परिणामकारक

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मोदींनी आणि मंत्र्यांनी ही लस घेतल्यामुळे सामान्य लोकांमध्ये या लसीबद्दल असणारी शंका दूर व्हायला मदत होईल. ब्राझिल आणि फिलीपिन्ससारख्या देशांना कंपनी ही लस विकण्याच्या प्रयत्नात आहे. भारत सरकारने कोवॅक्सिन आणि ऍस्ट्राझेनेका या दोन्ही लसींना जानेवारीत परवानगी दिली होती. भारताच्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला १ मार्च पासून सुरूवात झाली आहे.

Exit mobile version