आठवले पुन्हा मंत्री !

तिसऱ्यांदा मोदी सरकारमध्ये स्थान

आठवले पुन्हा मंत्री !

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले गेल्या १० वर्षांपासून केंद्रात राज्यमंत्री आहेत.आता पुन्हा एकदा रामदास आठवलेंनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची घेतली आहे. मोदी सरकारने दहा वर्षांच्या काळात त्यांना सामाजकि न्याय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

१९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाल्यानंतर रामदास आठवले या संघटनेत सहभागी झाले. १९९० ते १९९६ या काळात त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम केले. या काळात रामदास आठवले यांच्याकडे समाजकल्याम, परिवहन, रोजगार हमी या खात्यांचे मंत्रिपद होते. नंतरच्या काळात रामदास आठवले मुंबई उत्तर मध्य आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.

हे ही वाचा:

मुरलीअण्णांना लॉटरी !

गडकरींची मंत्रीपदाची हॅट्रिक!

बुलढाण्याला जिल्ह्याला २२ वर्षांनी मंत्रीपद !

गोयल यांची पुन्हा वर्णी !

१९९८ मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. त्यानंतर सलग दुसऱ्या टर्ममध्येही लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.२०१४ साली राज्यसभेवर निवडून गेले. तर २०१६ मध्ये रामदास आठवले यांची सामाजिक न्याय खात्यामधील राज्यमंत्रिपदावर नियुक्ती झाली.

Exit mobile version