विनोद कांबळी म्हणाला, ही चूक पुन्हा होणार नाही!

मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली भेट

विनोद कांबळी म्हणाला, ही चूक पुन्हा होणार नाही!

माजी क्रिकेट विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्याने सध्या त्यांच्यावर भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. क्रिकेटपटूला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उपचारासाठी पाच लाखांची मदत जाहीर केली. विनोद कांबळी यांनी शिदेंचे आभार मानले आहेत. याच दरम्यान, शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विनोद कांबळींची भेट घेत मदतीचा हात पुढे केला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, विनोद कांबळींवर पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी घेतली आहे. विनोद कांबळीची प्रकृती आता खूप चांगली आहे. वानरसेना नावाची आमची संस्था आहे. ही संस्था ज्या कोणाला गरज असेल, त्याला महिना दोन महिन्यात मदत करत असतात. काही महिन्यांपूर्वी वानरसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. या संस्थेच्या माध्यमातून २० लाख जमा झाले आहेत”, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

अरविंद केजरीवाल यांना घरचा आहेर

केजरीवाल यांची ‘महिला सन्मान योजना’ अस्तित्वातच नाही? दिल्ली सरकारनेचं केले स्पष्ट

संसद भवनाजवळ एकाने स्वतःला घेतलं पेटवून; पोलिसांना सापडली अर्धवट जळालेली चिठ्ठी

अन्सारुल्ला बांगला टीमच्या दोन दहशतवाद्यांना अटक

ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्यानंतर मी आज विनोदची भेट घेतली. आतापर्यंत विनोद कांबळी यांना ३० लाख रुपयांची मदत मिळाली आहे. गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल , इंदिराबाई बाबुराव सरनाईक आणि आकृती हॉस्पिटल या तिन्ही हॉस्पिटलमार्फत विनोद कांबळी यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत आणि तेही मोफत. त्याच्यावर पूर्ण उपचार करण्याची जवाबदारी आम्ही घेतली आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

‘आयुष्याची सेंच्युरी मारायची आहे,’ असे मी विनोद कांबळीला सांगितले आहे. विनोदने गरज नसताना काही चूक केल्या, त्या तो आता भोगतोय. आता ‘ही चूक पुन्हा होणार नाही,’ असे त्याने सांगितले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Exit mobile version