मुंबईतील शैक्षणिक संस्थांमधील मुलींच्या संरक्षणासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नवे आदेश दिले आहेत. मुंबईतील प्रत्येक शाळेत महिला स्वच्छता गृहाबाहेर महिला कर्मचारी तैनात ठेवण्याचे आदेश मंत्री लोढा यांनी दिले आहेत. बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवी नियमावली जारी केली आहे.
महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांचे वाढते प्रमाण थांबवण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि शासकीय आयटीआय संस्थांमध्ये करण्यात येणाऱ्या विशेष उपाययोजनांबाबत माहिती देताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुंबईतल्या प्रत्येक शाळेत मुलींसाठी आत्मरक्षणाशी संबंधित अभियान राबवले जाणार आहे. शाळेतील शिपायापासून मुख्याध्यापकांपर्यंत सर्वांना पोलीस पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. यामध्ये शाळेतील बस चालक, वाहक, सुरक्षा कर्मचारी, आणि कँटीनमधील कर्मचारी यांचा देखील समावेश असणार आहे.
हे ही वाचा :
टिकैत म्हणतात, आम्ही २५ लाख शेतकऱ्यांना संसदेच्या दिशेने घेऊन जायला हवे होते !
पाकिस्तानी संसदेत आता ‘बंदोबस्ता’साठी मांजरींची नियुक्ती
४५ वर्षानंतर भारताचे पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर, नरेंद्र मोदी रवाना !
हिंदूंच्या संरक्षाणासाठी चारही शंकराचार्य सरसावले !
ते पुढे म्हणाले, शाळेत महिला पालकांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला मुलीच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थेत सीसीटीव्ही बंधनकारक असणार आहे. तसेच पोलिसांना वेळोवेळी आढावा घेण्याचे आदेशही देण्यात आल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.