आयटीआयमध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण’

अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विद्यार्थ्यांसाठी घोषणा

आयटीआयमध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण’

साहित्यकार तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीत आणि परिवर्तनात आपल्या साहित्यातून अमूल्य योगदान दिलेले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी लिहिलेल्या कथा-कादंबऱ्या ही साहित्य क्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली पायरी ठरली आहे. त्यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी, समाजातील प्रत्येक घटकाला कौशल्य विकासाची संधी मिळावी या उद्देशाने राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे राज्यातील सर्व आयटीआय संस्थांमध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम’ सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

 

या कार्यक्रमामार्फत तयार झालेल्या अभ्याक्रमातून बांबूपासून शिल्प व वस्तू बनवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळेल तसेच अर्थार्जनासाठी या कौशल्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन सुद्धा मिळेल. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि स्वयं रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी शासन कार्यरत आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम करतायत

पंतप्रधान मोदींच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप; विरोधकांना धडकी

काँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती

लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी ख्याती असणारे साहित्यकार अण्णा भाऊ साठे हे आपल्या सर्वांचेच प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या साहित्याचा वसा घेऊन आपण सर्वच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत आहोत. त्यांच्या जयंतीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. तरुणांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन आपल्या राज्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले. राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील नवीन अभ्यासक्रमांची घोषणा करताना ते बोलत होते.

Exit mobile version