महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधवांचा सन्मान करण्यासाठी नवा शब्द सुचवला आहे. राज्यातील विधवा महिलांना गंगा भागीरथी संबोधण्यात यावे असा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.. लोढा यांनी प्रधान सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्याबरोबरच त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी दिव्यांगांसाठी दिव्यांग हा शब्द सुचवला होता. त्यामागचे कारण म्हणजे ‘अपंग’ लोकांना हा शब्द अपमानास्पद वाटला. नंतर केंद्र सरकारने दिव्यांग हा अधिकृत शब्द बनवण्याचा आदेश जारी केला. त्यामुळे अपंगांना समाजात मानाचे स्थान मिळाले असून त्यांच्याकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात क्रांतिकारी बदल झाला आहे असे लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दिव्यांग शब्दाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागीरथी हा शब्द वापरण्याचा प्रस्ताव तयार करून त्यावर चर्चा करण्यात यावी असे मंत्री लोढा यांनी पत्रात म्हटले आहे.महिला आयोगाकडून विधवांच्या नावांबाबत काही सूचना आल्या होत्या. महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी गंगाभारती हे नाव प्रचलित असल्याची सूचना आली. विधवांच्या सन्मानार्थ विधवाऐवजी ‘गंगा भागीरथी’ हा शब्द वापरण्याचा सविस्तर प्रस्ताव प्रधान सचिवांकडे पाठवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या विरोधात ‘सावरकर’ न्यायालयात
गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीवर युएपीए अंतर्गत कारवाई
ढलती का नाम महाविकास आघाडी मन्नू तेरा हुवा, अब मेरा क्या होगा?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आंबेडकर यात्रा ट्रेन’
विधवा महिलांचा सन्मान करण्यासाठी हा ठराव पाठवण्यात आला आहे. हा मुद्दा केवळ विचाराधीन आहे आणि या दिशेने कोणतीही कार्यवाही झाली नाही. मी तुम्हाला खात्री देतो की जोपर्यंत प्रस्ताव सादर केला जात नाही आणि विभागात त्यावर योग्य चर्चा होत नाही, तोपर्यंत या संदर्भात कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
प्रस्तावावर टीकेचे सूर
मंगल प्रभात लोढा यांच्या या प्रस्तावावर पुरोगाम्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. विधवा महिलांचा विशिष्ट उल्लेख केल्यास समाजात विधवा महिलांची ओळख जाहीर होईल, असा आक्षेप महिला संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे महिला संघटनांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. विधवा हा शब्द कटू वाटतो त्यावर चर्चा होऊ शकते. पण त्याआधी लावाच, असे सरकारचे सांगणे चुकीचे आहे. एखाद्या पुरुषाची बायको जेव्हा जाते तेव्हा तुम्ही काही लावता का? तुम्ही समतेची भाषा करता व असा निर्णय घेतात हा महिलांवर अन्याय नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.विधवांना गं. भा. संबोधण्याचा प्रस्ताव आणण्याच्या हेतूमागे महिलांचा सन्मान नसून महिलांना अपमानित करण्याचा मनुवादी हीन हेतू असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.