कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत जमा होणार!

सरकारकडे ५५० कोटींची मागणी केली असून लवकरच मंजूर होईल, मंत्री अब्दुल सत्तार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत जमा होणार!

यावर्षी कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने राज्य सरकारने अनुदान देण्याचे जाहीर केले होते मात्र,शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही,असा प्रश्न विधानपरिषदेत काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर ५५० कोटींची मागणी या अनुदानासाठी करण्यात आली असून १५ ऑगस्टपर्यंत ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

या प्रश्नाला उत्तर देत मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, सरकारकडे ५५० कोटींची मागणी केली असून लवकरच मंजूर होईल आणि १५ ऑगस्टच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचे आश्वासन दिले. आजच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी यांना सरकारकडून मिळणारे अनुदान अजून मिळाले नसल्याने विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानावरील चर्चेत आमदार सतेज पाटील यांनी भाग घेतला.

हे ही वाचा:

जनतेचा एकच पुकार, देशात पुन्हा मोदी सरकार

जगविख्यात मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन

भागवत कराड घेणार सात कोटींचे घर

आंदोलनकर्त्या विनेशविरोधात युवा कुस्तीगीराची लढाई न्यायालयात

ते पुढे म्हणाले,कांदा उत्पादक शेतकरी अनुदानाची वाट पहात आहे म्हणून सरकार शेतकऱ्यांना पैसे कधी देणार व किती देणार हे स्पष्ट करावे. याला उत्तर देताना, मंत्री अब्दुल सत्तार यांनी सरकारकडे ५५० कोटींची मागणी केली असून लवकरच मंजूर होईल आणि १५ ऑगस्टच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.तसेच शेतकऱ्यांच्या पेरणीविषयक ज्या बाबी आहेत त्यावरही मार्ग काढण्यात येईल आणि शेतकऱ्यांना लवकरच त्यांचे अनुदान मिळेल अशी ग्वाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.

Exit mobile version