मिनी नोटबंदी; २००० च्या नोटा ३० सप्टेंबर नंतर बंद

मिनी नोटबंदी; २००० च्या नोटा ३० सप्टेंबर नंतर बंद

मुंबई : केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने आज एक अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत चलनातील दोन हजारच्या नोटा ३० सप्टेंबर नंतर बंद होणार असे सरकारच्या मार्फत जाहीर करण्यात आले आहे. नोटा बदलण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना ८ नोव्हेंबर २०१६ रोजी लागू करण्यात आलेल्या नोटबंदीची आठवण झाली.

रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना दोन हजारांच्या नोटांचा वापर तात्काळ बंद करण्याचा आदेश जारी केला असून, व्यवहारात मात्र या नोटांचा ३० सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये लागू करण्यात आलेल्या नोटबंदीमध्ये बँकेत कमाल साडेसहा लाख रुपये जमा करण्यात येतील, अशी मर्यादा ठेवली होती.
दोन हजारच्या नोटा सरकारने नोटबंदीनंतर जारी केल्या. परंतु हळुहळु या नोटा बाजारातून कमी करायला सरकारने सुरुवात केली. २०१८ पर्यंत सुमारे ६.७३ लाख कोटी रुपयांच्या दोन हजारच्या नोटा चलनात होत्या. या प्रमाण चलनात असलेल्या नोटाच्या ३७.३ टक्के होते. ३१ मार्च २०२३ पर्यंत हे प्रमाण फक्त १०.८ टक्क्यांवर येऊन चलनात असलेल्या दोन हजारच्या नोटांची किंमत ३.६२ लाख कोटीपर्यंत आली.

हेही वाचा :

नड्डा यांचा ‘पीए’ असल्याचे सांगत आमदाराकडून पैशांची मागणी !

अदानी उद्योग समूहाला सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची क्लीन चिट !

हिंदू निर्वासितांच्या घरावर चालवला बुलडोझर

समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून दिलासा !

२०१६-१७ या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या ३५,४२९.९१ कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. २०१७-१८ मध्ये केवळ १११५.०७ कोटी नोटा छापण्यात आल्या. त्यात कपात करून २०१८-१९ मध्ये केवळ ४६६.९० कोटी नोटा छापण्यात आल्या. २०१९-२०, २०-२१ आणि २१-२२ या तीन आर्थिक वर्षांमध्ये दोन हजार रुपयांची एकही नोट छापलेली नाही.

एका वेळी किती नोटा बदलता येणार

एका वेळी केवळ २०,००० रुपयांपर्यंत नोटा बदलता येऊ शकणार आहेत. यासाठी बँकांना वेगळे काउण्टर
उघडावे लागणार आहेत.

Exit mobile version