नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत जवळपास दीड हजारांहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दंगली प्रकरणी पोलिसांनी संशयितांमध्ये काही मविच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश केलेला आहे. या मविआ नेत्यांवर चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष हनीफ बशीर, उबाठाचे पदाधिकारी निलोफर शेख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी अरिफ हाजी पटेल शेख यांचा समावेश आहे. या प्रकरणी एमआयएमचे शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी आतापर्यंत ५७ आरोपी निष्पन्न झाले असून ३५ हून जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान नाशिक पोलिसांवर जमावाने हल्ला केला होता आणि या हल्ल्यात २१ पोलीस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले होते. तर २५ ते ३० वाहनांची तोडफोड देखील झाली होती.
नाशिक पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये एमआयएमचे शहराध्यक्ष मुख्तार शेख यांचा समावेश आहे. काल (१७ एप्रिल) त्यांना हि अटक झाली आणि त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यासह तीन दिवसांपूर्वी अटक केलेल्यांना तीन दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्व आरोपींना उद्या पुन्हा एकदा नाशिकच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मात्र, या प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शन समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. दगडफेक करणाऱ्या आरोपींसोबत राजकीय नेत्यांचा संबध आहे का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा :
भारतात डिझाईन केलेला एआय सर्व्हर ‘आदिपोली’!
रशियाने युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर क्षेपणास्त्र टाकले?, दूतावासाने दिले उत्तर!
पंतप्रधान मोदींचा एलोन मस्क यांना फोन; कोणत्या विषयांवर केली चर्चा?
पूर्वांचलची पूजा यादव थेट भारतीय संघात!
नाशिक पोलिसांनी या राजकीय नेत्यांवर आरोप केला की, सोशल मिडीयाच्या माध्यमातून या लोकांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांना भडकवण्याचे काम केले होते. त्यांच्या भावना भडकवण्याचे काम केले होते. दरम्यान, या दंगलीत राजकीय कनेक्शन खरेच आहे का? हे पोलिसांच्या तपासातून लवकरच समोर येणार आहे.