भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरा करण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेमुळे स्वातंत्र्य दिनापूर्वी राष्ट्रध्वजाची मागणी वाढली आहे. स्वातंत्र्यदिनासाठी १३ ते १४ दिवस अजून बाकी आहेत.
तिरंगा मोहिमेत सहभागी होण्यासाठी जगभरात जय्यत तयारी सुरु आहे. त्याची झलक मुंबईतही दिसून येत आहे. मुंबईतील द फ्लॅग कॉरपोर्रेशन मार्फत लाखो तिरंगा ध्वज बनवायचे कार्य हाती घेतले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका असलेल्या मुंबई महानगर पालिकेने २५ लाख तिरंगा ध्वज बनवण्याचे नियोजन केले आहे. द फ्लॅग कॉरपोर्रेशन संस्थेमध्ये ऑर्डर पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस संस्थेचे काम चालू आहे.
द फ्लॅग कॉरपोर्रेशन संस्थेला मुंबई महानगर पालिकेकडून २५ लाख तर नवी मुंबई महापालिकेने ७५ हजार तिरंगा ध्वज बनवण्याचे ऑडर मिळाले आहेत. तसेच गुजरात, झारखंड आणि तामिळनाडू येथून तिरंगी ध्वजांची मागणी येत आहे. याआधी या संस्थेला एवढी ऑर्डर केव्हाच मिळाली नव्हती. तसेच भाजपच्या वतीने १० लाख तिरंगा ध्वज मोफत वाटण्याची तयारी सुरु आहे. पंतप्रधानांच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबद्दल देशभरात असलेल्या उत्साहाचा अंदाज लावता येतो. तसेच या संस्थेला जगभरातून तिरंगा झेंडा बनवण्याच्या ऑडर येत असतात.
हे ही वाचा:
संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख
शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या
गणरायांसाठी रेशमी फेटा आणि पितांबर
बनावट नोटा छापण्यामागे सुशिक्षित तरुणांचं ‘कनेक्शन’
नवी मुंबई आणि मुंबई महानगर पालिकेकडून तिरंग्याची मागणी आली आहे. या पूर्वी ही मागणी हजारात असायची मात्र या अभियानामुळे तिरंग्याची मागणी काही लाखांनी वाढली आहे. त्यामुळे ध्वज बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. अशी माहिती द फ्लॅग कॉरपोर्रेशनचे मालक ज्ञान शहा यांनी दिली.