५०० घरांची सोडत; गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

५०० घरांची सोडत; गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळणार

राज्य सरकार लवकरच गिरणी कामगारांसाठी ५०० घरांची सोडत काढणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, २१ ऑगस्ट रोजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गिरणी कामगारांसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ही मोठी घोषणा केली.

गिरणी कामगारांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच गिरणी कामगारांना फक्त मुंबईतच नाही तर त्यांच्या गावाजवळ, तालुक्याजवळही घर घेता येईल, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

“अनेक गिरणी कामगार घरापासून वंचित राहिले ही वस्तुस्थिती आहे. मुंबईच्या जडणघडणीत गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सरकारने अतिशय गांभीर्याने गिरीणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई एमएमआरमध्ये हाऊसिंग स्टाफ वाढवणं किंवा मुंबईच्या बाहेर जे गिरणी कामगार आहेत त्यांच्या गावाजवळ किंवा गावाजवळील शहरात, तालुक्याजवळ घर घेऊ इच्छित आहेत तसा पर्याय ठेवण्यात आला आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एनटीसी मिलच्या विकासाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेऊन त्या जागांवर देखील गिरणी कामगारांना घरे कसे देता येतील, याबाबत सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर १ लाख ७४ हजार अर्ज आले असून यापैकी पात्र आणि अपात्र बाबत तीन महिन्यात निर्णय घेण्याची सूचना प्रशासनाला दिल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह एका दहशतवाद्याचा खात्मा

‘पुढील ३० वर्षे पंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपचेच वर्चस्व’

स्पेनच्या महिला संघाची कमाल; पहिल्यांदाच जिंकले फुटबॉलचे विश्वविजेतेपद

ऋतुराज बरसला, संजू, रिंकूही ठरले दमदार

पनवेल आणि कल्याणमधील घरांची डागडुजी युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना दिल्या असून जवळपास पाच हजार घरांची लॉटरी ताबोडतोब काढता येतील, अशी चर्चा बैठकीत झाली आहे. महायुतीन सरकार सत्तेत आल्यानंतर तीन- चार वेळेला लॉटरी काढली होती. जवळपास एक हजार घरे देण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे घरे दिली देखील आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Exit mobile version