जय जवान, तुम्हाला सलाम!

लष्कर दिन विशेष

जय जवान, तुम्हाला सलाम!

भारतीय लष्कर आपल्या शौर्य आणि कार्यक्षमतेसाठी ओळखले जाते. भारताच्या सुरक्षेतील त्यांचे अमूल्य योगदान शब्दात वर्णन करता येणार नाही.देशाचे रक्षण करणाऱ्या आणि नैसर्गिक आपत्तीत लोकांना मदत करणाऱ्या भारतीय सेनेला गौरवशाली परंपरा लाभली आहे. १९४९ मध्ये या दिवशी भारतीय सैन्य ब्रिटीश सैन्यापासून पूर्णपणे मुक्त झाले आणि फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख बनले. तेव्हापासून १५ जानेवारी हा लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो.

केएम करिअप्पा यांचा जन्म १८९९ मध्ये कर्नाटकातील कुर्ग येथे झाला. पहिले भारतीय लष्करप्रमुख के.एम. करिअप्प्पा यांच्या आधी ब्रिटिश वंशाचे फ्रान्सिस बुचर हे लष्करप्रमुख होते. करीअप्पा यांनी १९४७ च्या भारत-पाक युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व केले. फील्ड मार्शल करिअप्पा यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश भारतीय सैन्यातून केली. केएम करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी कमांडर बनले. करीअप्पा यांनी १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पश्चिम सीमेवर सैन्याचे नेतृत्व केले. केएम करिअप्पा १९५३ मध्ये निवृत्त झाले.करीअप्पा यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी जनरल सर फ्रान्सिस बुचर हे भारतीय लष्कराचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ होते. त्यानंतर भारतीय लष्कर स्वतंत्र झाले.१९४९ मध्ये भारतीय सैन्यात फक्त २ लाख सैनिक होते. आज ही संख्या १३ लाखांहून अधिक आहे.

भारतीय लष्कर हे जगातील सर्वोच्च सीमेचे रक्षण करणारे पहिले सैन्य आहे. सियाचीन ग्लेशियरवर कडाक्याच्या थंडीत भारतीय सैनिक नेहमीच तैनात असतात. ही श्रेणी समुद्रसपाटीपासून ५ हजार मीटर उंचीवर आहे, जी जगातील सर्वोच्च श्रेणी आहे. भारतीय सैन्याने कधीही कोणत्याही देशावर प्रथम हल्ला केला नाही किंवा कोणत्याही देशावर कब्जा केला नाही असा रेकॉर्ड आहे. उत्तराखंड आपत्तीमध्ये भारतीय लष्कराने केलेले बचाव कार्य हे जगातील सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठे बचाव कार्य मानले जाते.दारूगोळा-शस्त्रांच्या बाबतीत भारतीय लष्कर जगात चौथ्या क्रमांकावर आहे. या आधी अमेरिका, रशिया आणि चीन आहेत. लष्कराकडे जगातील सर्वात अचूक अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्रे आहेत. भारतीय लष्कराचे हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल हे जगातील सर्वोत्तम सैन्य प्रशिक्षण केंद्र मानले जाते. कझाकस्तानमध्ये भारतीय लष्कराचा आउटस्टेशन तळही आहे.

पाकिस्तानच्या २००० सैनिकांना गुडघे टेकवणे भाग पडले

१९४७ ते ४८, १९६५, १९७१ आणि १९९९ या काळात पाकिस्तानसोबत भारतीय लष्कराने चार मोठी युद्ध लढली . सर्व युद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी शत्रूला मत दिली. १९७१ मधील युद्ध सर्वात जास्त काळ म्हणजे १४ दिवस लढल्या गेले. पूर्वीचे पाकिस्तान म्हणजे आताच्या बांग्लादेशमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. आणि त्यावेळेला जवळपास ९३ हजार सैनिकांना बंदी बनवण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली लोंगोवालच्या युद्धात भारतीय लष्कराचे फक्त दोन जवान शाहिद झाले होते. याच युद्धावर बॉर्डर हा प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट बनवण्यात आला होता. १९७१ मध्ये झालेल्या लोंगोवालच्या लढाईत अतुलनीय शौर्य दाखवतांना भारतीय लष्कराच्या १२० जवानांनी पाकिस्तानच्या २००० सैनिकांना गुडघे टेकवणे भाग पडले. विशेष म्हणजे या लढाईत भारतीय लष्कराकडे फक्त एक जीप होती आणि त्यावर एम ४० रायफल लावण्यात आली होती तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी सैन्याकडे तब्ब्ल २००० सैनिक आणि रणगाड्यांचा ताफा होता.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

तिन्ही दलांची कामगिरी स्पृहणीय
भूदल, नौदल आणि हवाईदल हे भारतीय लष्कराचे ती भक्क आधारस्तंभ आहेत. या तिन्ही दलांची कामगिरी तितकीच स्पृहणीय आहे. भरतीय हवाई दलाच्या कामगिरींबाबत सांगायचे तर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानवर केलेला बालाकोट हवाई हल्ला , १३एप्रिल १९८४ रोजी ऑपरेशन मेघदूत , १९४७-४८ मधील काश्मीर ऑपरेशन सांगता येईल. नौदल देखील कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपली अनेक जहाजे ऑक्सिजन पुरवठ्यात कार्यरत ठेवली , १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात नौदलाने बॉम्बफेक करून पाकिस्तानच्या कराची बंदराचा नाश केला. श्रीलंका आणि मालदीवमधील दहशतवाद संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आज थोड्याशा थंडीत देखील आपण गारठून छान पांघरून घेऊन झोपी जातो पण ऊन, वारा पावसाची, बर्फाची कसलीच तमा न बाळगता हे जवान आपल्या कोणत्याही गोष्टींचा बाऊ न करता अखंड दिवस रात्र डोळ्यांत तेल घालून आपल्या जीवाची बाजी लावतात. त्यांच्यामुळेच आज आपण शांत झोप घेऊ शकतो अशा या निडर जवानांना या दिवसाच्या निमित्ताने मनापासून सलाम.

Exit mobile version