संरक्षण मंत्रालयाच्या प्रदर्शनात दिसली स्वदेशी शस्त्रांची ताकद

१५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग

संरक्षण मंत्रालयाच्या प्रदर्शनात दिसली स्वदेशी शस्त्रांची ताकद

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेसाठी नवी दिल्लीतील प्रगती मैदानात गुरुवारी ‘मिलिपोल इंडिया’ या संरक्षण मंत्रालयाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. फ्रान्सचे संरक्षण मंत्रालय, भारताचे गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात स्वदेशी शस्त्रांची ताकद पाहायला मिळत आहे. यातील अनेक शस्त्रे भारतीय सैन्यदलात याआधीच दाखल झाली असून अन्य लवकरच ताफ्यात येणार आहेत.

 

या प्रदर्शनात १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या आहेत. प्रदर्शनात बंदुक, पिस्तुल, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन ठेवण्यात आली आहेत. मात्र यात सर्वांत उल्लेखनीय शस्त्र म्हणजे बीएमपी सी-थ्रू आर्मर आहे. तर, सियाचिनमधील दुर्गम डोंगराळ भाग असो की लडाखमधील उंचच उंच शिखरे… आता येथे तैनात असलेल्या सैनिकांना औषधांपासून शस्त्रे व अन्य साधने सहजच पुरवली जाऊ शकतात.

 

या प्रदर्शनात या वस्तू सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. ड्रोनला पाहिण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. हा ड्रोन फायबरचा बनला असून त्याचे वजन एकूण तीन किलो आहे. हे सहजच २० हजार फूट उंचीवरून उडू शकते. विशेष म्हणजे हा ड्रोन उंच डोंगराळ भागात आपल्या स्वतःच्या वजनापेक्षा तीनपट अधिक सामान उचलू शकतो. उणे ३० ते ५० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात सहा तास उड्डाणाचीही त्याची क्षमता आहे.

हे ही वाचा:

इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार; गाझामधील बळींची संख्या सात हजारांवर

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष

‘अल जझिराचे युद्धावरील वृत्तांताचे प्रमाण कमी करा’

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव

बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी सोनार मशिन

एखाद्या दुर्घटनेत बुडालेल्या लोकांनाही आता सहजच शोधले जाऊ शकते. यासाठी असलेल्या सोनार हँडी मशिनला स्वदेशी कंपनीने तयार केले आहे. सोनारआधारित या उपकरणाद्वारे पाण्याच्या आत ५० मीटरपर्यंत अडकलेल्या कोणत्याही माणसाचा माग काढला जाऊ शकतो. पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवून याचा वापर केला जाऊ शकतो.

Exit mobile version