मुंबई पोलिसांतील ज्येष्ठ अधिकारी मिलिंद खेतले यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे. पोलिस खात्यात काम करत असताना त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती वैशिष्टपुर्वक सेवा पदकाने गौरविण्यात आले आहे. शुक्रवार, २५ मार्च रोजी हे पदक प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले आहे. मुंबईत राजभवन येथे हा सोहळा पार पडला.
मिलिंद खेतले यांना या आधी देखील दोन राष्ट्रपती पदके मिळाली आहेत. यापूर्वी त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक आणि राष्ट्रपती गुणवत्तापूर्वक सेवा पदक मिळाले आहे. त्यानंतर हे तिसरे राष्ट्रपती पदक त्यांनी कमावले आहे. मिलिंद खेतले हे सध्या मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान डिव्हिजनचे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून काम पाहात आहेत.
हे ही वाचा:
‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो कायदेश्वर’
‘कोरोना काळात शालेय शिक्षणासाठी फी कमी न करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य’
आमदारांना मुंबईत घरे मिळणार, पण…
“मैं आदित्यनाथ योगी…” दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री म्हणून शपथ
मिलिंद खेतले हे एक स्वच्छ प्रतिमेचे पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक महत्वाच्या केसवर काम केले आहे. काही दिवसांपूर्वी हाय प्रोफाइल अशा समीर वानखेडे प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात ते तपास करत होते.