मुख्यमंत्री शिंदेनी पत्ता टाकला, आदित्य ठाकरेंविरुद्ध मिलिंद देवरा वरळीच्या मैदानात!

मिलिंद देवरा यांनी ट्वीटकरत दिले लढण्याचे संकेत

मुख्यमंत्री शिंदेनी पत्ता टाकला, आदित्य ठाकरेंविरुद्ध मिलिंद देवरा वरळीच्या मैदानात!

या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले मिलिंद देवरा पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळी मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत.

शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) मिलिंद देवरा यांनी आता ट्वीट करून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंविरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे मैदानात आहेत. संदीप देशपांडे यांना शिंदे गटाकडून पाठींबा मिळेल अशी चर्चा होती. मात्र, आज मिलिंद देवरा यांनी केलेल्या ट्वीटमुळे वरळीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा : 

मेधा सोमय्या मानहानी प्रकरण: संजय राऊतांना ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन

“लोकसभेत माविआचा कोकणातून एकही खासदार निवडून आला नाही आता आमदारही दिसणार नाही”

खलिस्तानी दहशतवादी बलजीत सिंगला अटक!

पुण्यातून नाकाबंदीदरम्यान सापडले १३८ कोटींचे सोनं

शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे वरळीचे विद्यमान आमदार आहेत आणि ते २०१९ मध्ये तेथून विजयी झाले होते. परंतु, यंदाची निवडणूक आदित्य ठाकरेंना सुद्धा सोपी जाणार नसल्याचे म्हटले जात आहे.

जानेवारीमध्ये शिवसेनेत दाखल झालेले मिलिंद देवरा हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना वरळीची जबाबदारी देण्यात आली होती. वरळी हा मराठी मतदार, मच्छिमार आणि श्रीमंत लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ आहे. मिलिंद देवरा हे वरळीत वर्चस्व गाजवून विजय मिळवू शकतात अशी चर्चा होत आहे.

Exit mobile version