भारताने लसीकरण मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा गेल्या २४ तासात गाठला आहे. गेल्या २४ तासात भारातात एकूण ३१ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
भारताच्या लसीकरण मोहिमेला जानेवारी महिन्यात प्रारंभ झाला. भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवायला सुरूवात केली आहे. गेल्या चोविस तासात भारताने ३१ लाख लोकांचे लसीकरण करून यात एक मैलाचा दगड गाठला आहे. याबरोबरच भारताने १३ कोटी ५४ लाख ७८ हजार ४२० लोकांचे आत्तापर्यंत लसीकरण केले आहे.
हे ही वाचा:
कोविड-१९ वर औषध सापडल्याचा दावा
मोदी सरकारकडून देशातील गरीबांना मिळणार मोफत धान्य
ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा थेट जर्मनीहून
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आधारे लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. आता स्पुतनिक-५ या लसीच्या वापराला देखील भारत सरकारने मान्यता दिली आहे. त्याबरोबरच भारताने अजून चार लसींच्या वापराला देखील मान्यता दिली आहे. लसींसोबतच झायडस कॅडिला या कंपनीने विराफिन हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचा दावा देखील केला आहे.
भारतात सध्या कोरोनाचा विस्फोट झाला आहे. देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तिसगढ, मध्य प्रदेश, तमिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यात कोरोनाचा प्रसार भयावह वेगाने होत आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे ७५ टक्के रुग्ण हे याच दहा राज्यांपैकी असल्याचे आढळून आले आहे. भारतात गेल्या चोविस तासात सुमारे ३ लाखापेक्षा अधिक रुग्णवाढ नोंदली गेली. ही आजवरची सर्वाधिक विक्रमी वाढ ठरली आहे. गेले तीन दिवस सलग सातत्याने तीन लाखापेक्षा अधिक रुग्ण देशभरात आढळून येत आहेत.