हिंगोली, नांदेड अन् परभणीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली, नांदेड अन् परभणीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के!

हिंगोली, लातूर, परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज(२१ मार्च) सकाळी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.भूकंपाच्या धक्क्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मण झाले आहे.दरम्यान, या घटनेत कोणत्याही प्रकारचे नुकसान अथवा जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे.

हिंगोली जिल्यातील आखाडा बाळापूर, वारंगा फाटा जिल्हा हिंगोली या ठिकाणी भूकंपाच्या केंद्रबिंदूची नोंद झाली आहे. हिंगोली वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच नांदेड जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज तसेच सौम्य धक्का जाणवला आहे.सकाळी ६. ०८ मिनिटांनी आणि ६ .१९ वाजता या वेळेत भूकंपाचे धक्के जाणवले.

हे ही वाचा:

चीनची भागीदारी असलेल्या पाकमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला

जर पुन्हा औरंगजेबाशी तुलना कराल तर अन्य दोन कबरी खोदाव्या लागतील!

आरोपी साजिदची आई म्हणाली, एन्काउंटरमध्ये मुलाच्या मृत्यूचे दु:ख नाही!

नेमकं काय भोवलं ? राजकीय असंग की मनसुखच्या पत्नीचे शाप?

लातूर येथील भूकंपमापक केंद्रात झालेल्या नोंद नुसार ४.५ व ३.६ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले आहेत.नांदेड परभणी, आणि लातूर जिल्ह्यात देखील भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.मिळालेल्या महितीनुसार, कोणत्याही प्रकारचे नुकसान आणि जीवितहानी झालेली नाही.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आव्हान लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे भूकंपाच्या धक्क्याने एक भीत कोसळल्याची माहिती आहे.भूकंपाचे दोन धक्के बसले.पहिला ६ वाजून ६ मिनिटांनी तर दुसरा भूकंपाचा झटका ६ वाजून १६ ते १८ मिनिटाला जाणवला.

 

Exit mobile version