वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक करण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शाह फरार झाला होता. मिहिर शाहच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ११ पथके स्थापन केली होती. अखेर मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शहापूरमधून आरोपी मिहीर शाहला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्यासह १२ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या १२ जणांमध्ये आरोपी मिहीर शाहच्या आईचा आणि बहिणीचा देखील समावेश आहे. या १२ जणांनी आरोपी मिहीर शाहला पळून जाण्यास मदत केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, यापूर्वी या प्रकरणी मिहीर शाह यांचे वडील राजेश शाह यांना अटक करण्यात आली होती. यानंतर राजेश शाह यांना १५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर कालच जामीन मंजूर झाला होता.
हे ही वाचा:
हिंदू धार्मिक स्थळ परिसरातील मुस्लीम समाजाची दुकाने हटवा
म्हणे “धर्मनिरपेक्षतेसाठीच अल्पसंख्यांकांना राजकीय आरक्षण !”
वसंत मोरेंची आता नवी पसंत..उबाठा गटात प्रवेश !
दाम्पत्याच्या आत्महत्येचे अखिलेश यादव यांनी केले राजकारण
दरम्यान, आरोपी मिहीर शाह हा अपघातापूर्वी जुहूतील ग्लोबल तपस बारमध्ये दारू प्यायल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दिवसांच्या तपासानंतर बार वर कारवाई केली आहे. बारचालकाकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सील केला आहे.