भारतीय नौदलाचे मिग- २९ के हे लढाऊ विमान बुधवारी गोव्यात कोसळले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, या घटनेतील पायलट सुरक्षित आहे. एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी लढाऊ विमान आपल्या तळावर परतत होते. अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय नौदलाने चौकशी समिती स्थापन केली आहे. नौदलाचे हे मिग- २९ के लढाऊ विमान नियमित उड्डाण करत होते, असे सांगितले जात आहे.
नौदलाने ट्विटरवर शेअर केलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हे लढाऊ विमान गोव्याच्या किनारपट्टीवरून नियमित उड्डाण करत होते. तेव्हाच त्यात तांत्रिक बिघाड आढळून आला, त्यानंतर पायलट त्याच्या बेस स्टेशनवर परत जाऊ लागला. यादरम्यान विमान कोसळले. अपघातापूर्वी पायलटने स्वत:ला सुखरूप बाहेर काढले.
हे ही वाचा:
… म्हणून रशियाकडून ‘मेटा’ दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना म्हणून घोषित
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव
सुरक्षेच्या दृष्टीने मिग- २९के चा रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. त्यामुळेच नौदल कोची येथील आयएनएस विक्रांतकडून २५-२६ विदेशी लढाऊ विमाने घेण्याचा विचार करत आहे. मिग- २९ गोव्यातील आयएनएस हंसा नौदल तळावर तैनात करण्यात आले आहे. हवेत असताना मिग- २९ मध्ये तांत्रिक बिघाड होण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु नोव्हेंबर २०२० मध्ये मिग-२ ९के उड्डाण करताना बिघाड झाला होता, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यात असलेल्या पायलटचा मृत्यू झाला होता. तर एका पायलटला घटनेनंतर लगेचच वाचवण्यात यश आले. अपघातानंतर ११ दिवसांनी कमांडर निशांत सिंह यांचा मृत्यू झाला होता.