हवाई दलाचे ‘मिग-२९’ लढाऊ विमान आग्राजवळ कोसळले, पायलट सुरक्षित!

हवाई दलाकडून चौकशीचे आदेश

हवाई दलाचे ‘मिग-२९’ लढाऊ विमान आग्राजवळ कोसळले, पायलट सुरक्षित!

उत्तर प्रदेशातील आग्राजवळ भारतीय हवाई दलाचे ‘मिग-२९’ हे लढाऊ विमान कोसळले आहे. ‘मिग-२९’ लढाऊ विमानाने पंजाबमधील आदमपूर येथून उड्डाण घेतले होते आणि सरावासाठी आग्राला जात होते. याच दरम्यान अपघात झाला. जमिनीवर पडताच विमानाने पेट घेतला, मात्र त्याआधीच वैमानिकांनी प्रसंगावधान राखून पॅराशूटच्या सहाय्याने उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. दरम्यान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हवाई दलाने एका निवेदनात म्हटले की, आयएएफचे एक मिग-२९ विमान आज (४ नोव्हेंबर) नियमित प्रशिक्षणादरम्यान आग्राजवळ क्रॅश झाले. तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे कारण शोधण्याचे हवाई दलाने आदेश दिले आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही पायलट सुखरूप बाहेर आले आहेत.

विशेष म्हणजे, आग्रा येथील एका गावाजवळच्या शेतात हे विमान कोसळले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, २  सप्टेंबर रोजी राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-२९ हे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले होते. या दुर्घटनेत विमानाचे पायलट सुखरूप बचावले होते.

हे ही वाचा : 

विवाहित हिंदू महिला आणि तिच्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

अकबर, एन्थनी मागे सरले, आणि जरांगे हादरले… मालकाच्या इशाऱ्यावरून माघार!

हिजाबविरोधात इराणमध्ये विचित्र आंदोलन

गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार, संजय उपाध्याय यांची उमेदवारी कायम!

Exit mobile version