राजस्थानमध्ये हवाई दलाचे विमान कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू

राजस्थानमध्ये हवाई दलाचे विमान कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू

राजस्थानमधील बाडमेरमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. हवाई दलाचं मिग फायटर प्लेन (MiG-21) कोसळून अपघात झाला आहे. या विमान अपघातात दोन्ही पायलट्सचा मृत्यू झाला आहे. गुरुवार, २८ जुलै रोजी रात्री ही दुर्घटना घडली. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

भीमडा येथे काल रात्री हा अपघात झाल्यानंतर परिसरात आगीचे मोठे लोळ उठले होते. माहितीनुसार, अपघातानंतर विमानाचे अवशेष एक किलोमीटरपर्यंतच्या परिसरात पसरले आहेत. रात्री ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात दोन्ही पायलट्सचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. फायटर प्लेन मिग क्रॅश झाल्यानंतर ढिगाऱ्याला आग लागली होती. माहिती मिळताच प्रशासनाची टीम घटनास्थळी रवाना झाली होती.

हे ही वाचा:

शाब्बास.. १७ वर्षांखालील जागतिक कुस्तीत सूरज चमकला!

भ्रष्टाचारात लडबडलेले पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंबद्दलचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

८ वर्षात ७.२२ लाखांना मिळाल्या नोकऱ्या

गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी भारतीय हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान राजस्थानमधील जैसलमेरजवळ कोसळले होते. या अपघातात पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला होता. विंग कमांडर हर्षित सिन्हा यांनी जैसलमेर एअरफोर्स स्टेशनवरून नियमित विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाला हवेत आग लागली आणि विमान कोसळले होते.

Exit mobile version