राजस्थानच्या हनुमानगड येथे लष्कराचे मिग- २१ हे विमान कोसळून अपघात घडला आहे. या दुर्घटनेत पायलटचा जीव वाचला असला तरी दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. हनुमानगड येथील बहलोल नगर गावात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे.
आज सकाळी ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर १५ मिनिटांतच तांत्रिक बिघाडामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटले. तरीही पायलटने विमानाला गावापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पॅराशूटच्या साहाय्याने आपला जीव वाचवला. मात्र, नंतर विमान हनुमागड येथे कोसळलं. पायलटच्या प्रयत्नांमुळे अपघातग्रस्त विमान दाट वस्तीच्या ठिकाणी कोसळून होणारी मोठी दुर्घटना टळली. मात्र, तरीही हे विमान एका घरावर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला.
#WATCH | Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Hanumangarh in Rajasthan. Two civilian women died and a man was injured in the incident, the pilot sustained minor injuries. pic.twitter.com/z4BZBsECVV
— ANI (@ANI) May 8, 2023
हे ही वाचा:
काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाला दीड कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी अटक
सुदानमधून आलेले भारतीय मोदींच्या प्रेमात
लष्करी परेडवर केलेल्या हल्ल्याबद्दल तेहरानमध्ये इराणी-स्विडिश नागरिकाला फाशी
राहुल म्हणजे एकदिवस सद्दाम, दुसऱ्या दिवशी अमूल बेबी
या अपघातानंतर विमानाचा चक्काचूर झाला आहे. विमान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू केलं. विमान पाहण्यासाठी या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी या गर्दीला पांगवून पुढील तपासाला सहकार्य केलं आहे.