मिग-२१ चा पुन्हा अपघात, स्क्वाड्रन लीडरचा मृत्यू

मिग-२१ चा पुन्हा अपघात, स्क्वाड्रन लीडरचा मृत्यू

पंजाबमधील मोगाजवळ गुरुवारी रात्री उशिरा, भारतीय वायुसेनेचं एक बायसन लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालं. नियमित प्रशिक्षण सुरु असताना ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटनेबाबत वायुसेनेनं दु:ख व्यक्त करत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय वायुसेनेच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

वेस्टर्न सेक्टरमध्ये काल रात्री बायसन एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झालं. वैमानिक, स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला वायुदल आधार देत आहे असं वायुसेनेनं ट्विट केलं. पुढे सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही देण्याच आल्याचं वायुदलानं सांगितलं आहे.

हे ही वाचा:

धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस, हा बहुदा सामना इफेक्ट

इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम जाहीर

मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत

आता दरवर्षी कोवॅक्सिनचे १ अब्ज डोस

यंदाच्या वर्षी मिग २१ च्या अपघाताची ही तिसरी घटना. मार्च महिन्यात ग्रुप कॅप्टन, ए. गुप्ता यांचाही अशाच अपघाताच मृत्यू झाला होता. त्यापूर्वी यंदाच्याच वर्षी जानेवारी महिन्यात राजस्थानमध्येही मिग क्रॅश होण्याची घटना घडली होती. वेस्टर्न सेक्टरमध्ये सॉर्टीदरम्यान, काही गंभीर तांत्रिक बिघाड झाल्यामुळं ही घटना घडल्याची माहिती वायुदलाकडून देण्यात आली होती.

Exit mobile version