अलास्कामध्ये लष्कराची दोन हेलिकॉप्टर हवेत धडकली, तीन सैनिकांचा मृत्यू

प्रशिक्षण मोहिमेवरून परतत असताना दुर्घटना

अलास्कामध्ये लष्कराची दोन हेलिकॉप्टर हवेत धडकली, तीन सैनिकांचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्का येथे अमेरिकेच्या दोन लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. फोर्ट वेनराईट येथील दोन अपाचे हेलिकॉप्टर प्रशिक्षण मोहिमेवरून परतत असताना आकाशात आदळून झालेल्या दुर्घटनेत तीन अमेरिकन लष्करी सैनिक ठार झाले आणि एक जखमी झाला. हा अपघात गुरुवारी झाल्याची माहीती देण्यात आली. अपघात घडला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये किती लोक होते हे अजून कळून शकलेलं नाही अमेरिकेत लष्करी हेलिकॉप्टरचा या वर्षात झालेला हा दुसरा अपघात आहे. या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे.

या दोन एएच-६४ आपाचे हेलिकॉप्टरमध्ये प्रत्येकी दोन सैनिक होते, असे लष्कराच्या अलास्काच्या प्रवक्त्याने सांगितले. ते फेअरबँक्स भागातील फोर्ट वेनराईट येथील ११ व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या अटॅक रिकॉनिसन्स बटालियनमधील होते, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.दोन सैनिकांना घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले आणि तिसर्‍याचा फेअरबँक्स रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. वाचलेल्या जखमी सैनिकांवर उपचार केले जात आहेत.

एएच – ६४ हे आपाचे हेलिकॉप्टर फेअरबँक्सजवळील फोर्ट वेनराईट येथील होते.अलास्काच्या आतील भागात पार्केस महामार्गावर या लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेली डेनाली नॅशनल पार्क आणि प्रिझर्व्हच्या उत्तरेस सुमारे १० मैल किंवा अँकरेजच्या उत्तरेस सुमारे २५० मैल अंतरावर हे ठिकाण आहे. हेलिकॉप्टरमध्ये किती लोक होते किंवा किती लोक जखमी झाले हे स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते जॉन पेनेल यांनी प्रत्येक हेलिकॉप्टरमध्ये दोन जण होते असे अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. परंतु त्याशिवाय अन्य काही माहिती नाही असे त्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे आणि ते उपलब्ध झाल्यावर अधिक तपशील जाहीर केले जातील असे पेलेम यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

बसमध्ये इयरफोनशिवाय व्हीडिओ, ऑडिओ ऐकलात तर कान पकडणार!

सरकारी बंगला बांधण्यासाठी चक्क ऐतिहासिक वास्तू केली जमीनदोस्त

राज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार

माहूरगडावर रेणुकामातेच्या दर्शनाला जा आता लिफ्टने!

याआधी फेब्रुवारीमध्ये तालकीतना येथून उड्डाण घेतल्यानंतर अपाचे हेलिकॉप्टर कोसळून दोन सैनिक जखमी झाले होते. फोर्ट वेनराईट ते अँकरेजमधील एल्मेंडॉर्फ-रिचर्डसनपर्यंत प्रवास करणाऱ्या चार हेलिकॉप्टरपैकी हे एक होते.. मार्चच्या सुरुवातीला, फोर्ट कॅम्पबेल, केंटकीच्या ईशान्येस सुमारे ३० मैल अंतरावर नियमित रात्रीच्या प्रशिक्षणादरम्यान अमेरिकेच्या लष्कराची दोन वैद्यकीय मदत करणारी दोन हेलिकॉप्टर कोसळून नऊ सैनिक ठार झाले. होते.

Exit mobile version