25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषसर्वाधिक मौल्यवान कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्टची ऍप्पलवर मात!

सर्वाधिक मौल्यवान कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्टची ऍप्पलवर मात!

आयफोन कंपनी चिंतेत

Google News Follow

Related

जगातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्टने सन २०२१नंतर पहिल्यांदाच ऍप्पलवर मात केली आहे. मागणी आटल्यामुळे आयफोनची या वर्षीची सुरुवात चांगली झाली नसून कंपनीच्या चिंतेत वाढ झाली आहे.मायक्रोसॉफ्ट कंपनीने चॅट जीपीटी बनवणाऱ्या ओपन एआय कंपनीत गुंतवणूक केल्यामुळे गेल्या वर्षीपासून कंपनीच्या समभागांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी त्यांच्या समभागांमध्ये ०.७ टक्के वाढ झाली.

त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बाजारातील मूल्य २.८७ ट्रिलियन डॉलर झाले. पहिल्या सत्रात समभागांमध्ये दोन टक्के वाढ झाली. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य २.९ ट्रिलियन झाले. तर, ऍप्पलचे समभाग ०.९ टक्क्यांनी घसरले. त्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य २.८७ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. गेल्या काही वर्षांपासून मायक्रोसॉफ्ट आणि ऍप्पल हे सर्वोच्च स्थान कायम टिकवून आहेत.‘मायक्रोसॉफ्ट ऍपलला मागे टाकेल, हे अपरिहार्य होते, कारण मायक्रोसॉफ्ट वेगाने वाढत आहे आणि जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील क्रांतीचा फायदा त्यांना अधिक होत आहे,’ अशी प्रतिक्रिया डी. ए. डेव्हिडसन आणि लिस्ट गिल ल्युरिया यांनी दिली.

हे ही वाचा:

‘डीपफेक’प्रकरणी येत्या सात ते दहा दिवसांत आयटी नियमांत सुधारणा!

दक्षिण आफ्रिकेचा इस्रायलवर नरसंहाराचा आरोप!

रेड सीमधील हुतींच्या कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिका- ब्रिटनचा एअरस्ट्राईक

जय श्रीराम: राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचे ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान

मायक्रोसॉफ्टने त्यांच्या सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये ओपन एआय तंत्रज्ञानाचे साह्य घेतले आहे. त्यामुळे जुलै-सप्टेंबर महिन्यात त्यांच्या क्लाऊड कम्प्युटिंग व्यवसायात वाढ झाली होती. तर, दुसरीकडे कमी मागणीमुळे ऍपलची अवस्था बिकट झाली आहे. सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये त्यांना मोठा फटका बसला आहे. करोनाकाळात अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्यातून चीन अद्याप सावरू शकलेला नाही. ऍपल कंपनीचे समभाग जानेवारीमध्ये ३.३ टक्क्यांनी घसरले होते तर, मायक्रोसॉफ्टच्या समभागात १.८ टक्क्यांनी वाढ झाली होती. मायक्रोसॉफ्टने सन २०१८पासून याआधीही ऍप्पलवर अनेकदा सर्वाधिक मौल्यवान कंपनीच्या स्पर्धेत मात केली आहे. सन २०२१मध्ये करोनासाथीच्या काळात आयफोन उत्पादक कंपनीला मोठा फटका बसल्याने मायक्रोसॉफ्ट ही कंपनी तेव्हाही सर्वाधिक मौल्यवान कंपनी ठरली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा