अमेरिकन अभिनेते मायकेल डग्लस मोदींच्या प्रेमात

अमेरिकन अभिनेते आणि चित्रपट निर्माते मायकेल डग्लस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली

अमेरिकन अभिनेते मायकेल डग्लस मोदींच्या प्रेमात

गोव्यात ५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) पार पडला. यावेळी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. अमेरिकन अभिनेते आणि चित्रपट निर्माते मायकेल डग्लस हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी डग्लस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. नरेंद्र मोदी हे चित्रपट निर्मिती क्षेत्र आणि वित्त क्षेत्रात करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त अनेक दिग्गजांनी भारतात हजेरी लावली होती. अमेरिकन अभिनेते आणि चित्रपट निर्माते मायकेल डग्लस यांनी त्यांची पत्नी कॅथरीन झेटा-जोन्स आणि त्यांचा मुलासोबत या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना म्हटले की, “भारत चांगल्या हातात आहे.”

या महोत्सवाची प्रासंगिकता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व कौशल्याविषयी बोलताना ते म्हणाले, “या महोत्सवाचे सौंदर्य हे आहे की, तुम्ही ७८ परदेशी देशांचे प्रतिनिधित्व केले होते. हे फक्त तुमच्या भारतीय चित्रीकरणाच्या ताकदीचे प्रतिबिंब आहे, जे जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे देश खूप चांगल्या हातात आहे.” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रयत्नांची देखील प्रशंसा केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “अनुराग ठाकूर आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या काही वर्षांत चित्रपटांच्या निर्मितीसाठी आणि वित्तपुरवठ्यासाठी अधिक पैसे लावलेले पाहिले आहेत, ते खूप यशस्वी झाले आहेत.”

हे ही वाचा:

वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली

राष्ट्रपतींवर हत्येच्या कटाचा आरोप करणाऱ्या श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांची उचलबांगडी

इंडिगो विमानात सीट गायब

उत्तर प्रदेशात बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर केली लघुशंका!

मायकेल डग्लस यांनी IFFI २०२३ मध्ये त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कॅथरीन झेटा-जोन्स तसेच त्यांच्या मुलासह हजेरी लावली. या तिघांचा महोत्सवात आगमन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माता शैलेंद्र सिंग यांनी आयोजित केलेल्या विशेष सत्रात डग्लस आणि जोन्स देखील सहभागी झाले होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, डग्लस यांनी दोन अकादमी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक एमी पुरस्कार मिळवला आहे. ‘वॉल स्ट्रीट’ (१९८७), ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ (१९९२), ‘फॉलिंग डाउन’ आणि इतर चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.

Exit mobile version