पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांनो, सीईटी परीक्षा पुन्हा होणार

पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांनो, सीईटी परीक्षा पुन्हा होणार

राज्यात सध्या पावसाने थैमान घातले असून त्याचा फटका सध्या राज्यात सुरू असणाऱ्या एमएचटी-  सीईटी (MHT- CET) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. पावसामुळे मराठवाड्यासह इतरही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही.  या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे.

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक परिसरात पाणी साचले असून रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील परीक्षा केंद्रांवर एमएचटी- सीईटीची परीक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना पोहोचता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते की काय, अशी भीती असताना या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा:

पालिका कर्मचारीच मागत होता फेरीवाल्यांकडून १०-१० रुपये…वाचा!

‘गुलाब’ चक्रीवादळामुळे १६ जणांनी गमावले प्राण; जनावरे, घरांचेही झाले मोठे नुकसान

‘भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह’ आता काँग्रेसचे घोषवाक्य असेल

भावना गवळी यांना आले ईडीकडून बोलावणे

ग्रामीण भागातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आल्याने विद्यार्थी गावांमध्येच अडकून पडले. नांदेड विभागामध्येही अनेक विद्यार्थ्यांनाही परीक्षेला हजर राहता आले नाही. लातूरमध्ये एमएचटी-  सीईटी परीक्षेचे सेंटर होते. दोन सत्रात जवळपास अडीचशे विद्यार्थी सीईटीची परीक्षा देणार होते. पण पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सेंटरवर पोहोचता आले नव्हते.

दरम्यान, मराठवाड्यात पुरामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा देता आली नाही त्यांनी प्रवेश परीक्षा कक्षाशी ई-मेलने संपर्क साधावा; त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल, असे प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.

Exit mobile version