शेवटी अनधिकृत बांधकामांवर म्हाडाचा हातोडा

शेवटी अनधिकृत बांधकामांवर म्हाडाचा हातोडा

म्हाडाच्या माध्यमातून घर घेणं हे मुंबईकरांचं स्वप्नं असताना सध्याच्य घडीला म्हाडाच्या सोडती कधी निघतात याची मुंबईकरांना वाट पाहावी लागत आहे. एकीकडे जागाच उपलब्ध नसल्यामुळे घरांच्या सोडती कशी काढायची हा प्रश्न म्हाडाला पडलेला असताना, दुसरीकडे अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाने म्हाडाला जेरीस आणले आहे.

शहरामध्ये म्हाडाच्याच भूखंडावर अनधिकृत बांधकामे उभी राहात असल्याचे आता निदर्शनास आलेले आहे. त्यामुळेच म्हाडाने आता अनधिकृत बांधकामांवर तोड कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. पश्चिम उपनगरातील गोरेगाव, मालाड, ओशिवरा परिसरात आता म्हाडाने तोड कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे.

मुंबईमधील अवैध बांधकामांना सर्वाधिक परवानगी ही कोरोना काळात दिली गेल्याचे आता समोर आलेले आहे. पालिका प्रशासन मात्र हे काम सुरु असताना कुंभकर्णी निद्रेत होते. मालाड पश्चिमेकडील ४ इमारतींमध्ये अवैध पद्धतीने केलेले तीन मजली बांधकाम तोडल्याची माहिती आता मिळत आहे. तसेच अवैध बांधकामांवर वेळीच कारवाई होत नसल्याची टीकाच आता म्हाडावर होत आहे. एकीकडे सर्वसामान्यांसाठी घराची प्रक्रीया करण्यातही म्हाडा अपयशी ठरले आहे. तर दुसरीकडे अवैध बांधकामांचा प्रश्नही जैसे थे आहे. म्हाडाच्या भूखंडावर सुमारे दीडशे अवैध बांधकामांच्या तक्रारी आलेल्या आहेत.

टाळेबंदी आणि कडक निर्बंध लागू असताना, मुंबईतील पश्चिम उपनगरात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले होते. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर कामाला वेग आला त्याच दरम्यान अवैध बांधकामे जोरात सुरु झाली. आजच्या घडीलाही अवैध बांधकामे सुरुच आहेत. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये पालिकेकडे १३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी अवैध बांधकामाच्या आलेल्या होत्या. आता तर म्हाडाच्या जागेवरच अनधिकृत बांधकामे उभी राहात आहेत.

हे ही वाचा:

खिळखिळ्या इमारतींबरोबर सेवाशुल्कामुळे म्हाडाचे रहिवाशीही जर्जर

पालिकेचा भंगारात नवा कोरा घोटाळा?

ठाण्यात गायब होताहेत मोबाईल आणि गाड्या

मॉल बाहेरूनच बघणाऱ्यांची संख्या वाढली

गेल्या सव्वा वर्षात अनधिकृत बांधकामासंदर्भात तब्बल १३ हजारांपेक्षा जास्त तक्रारींची नोंद झालेली आहे. सर्वाधिक अवैध बांधकामे मुंबईतील चेंबूर एम, चेंबूर एम पश्चिम, कुर्ला एल, विक्रोळी एस, कांदिवली आर – उत्तर या ठिकाणी खुलेआम झालेली आहेत.

Exit mobile version