टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये रौप्य पदकाला गवसणी घालणाऱ्या भाविना पटेल हिला मॉरीस गॅरेजेस (एमजी) यांनी एक गाडी भेट दिली आहे. भाविना पटेल हिला एमजी हेक्टर ही गाडी भेट म्हणून दिली आहे. भारताची पहिली इंटरनेट- कनेक्टेड एसयूव्ही हेक्टर भारतीय पॅरा- ऍथलीटसाठी कस्टमाइज्ड करण्यात आली आहे.
एमजी गॅरेजेस इंडियाने दि वडोदरा मॅरेथॉन यांच्यासोबत सहयोगाने टोकियो पॅरालिम्पिक्स २०२० मधील रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल हिला कस्टमाइज्ड एमजी हेक्टर भेट म्हणून दिली. या गाडीला रिडिझाईन करण्यात आले असून चालक हाताने ऍक्सेलरेटर आणि ब्रेक्सचा वापर करू शकणार आहे. व्हीलचेअर अटॅचमेंट्ससाठी विशेष रचना गाडीमध्ये करण्यात आली आहे. एमजी मोटर इंडियाचे चीफ टेक्निकल ऑफिसर जयंत देब यांच्या हस्ते भाविना पटेल हिला कस्टमाइज्ड हेक्टर सुपूर्द करण्यात आली.
As a gesture to appreciate the grit and determination of Tokyo Paralympics winner Bhavina Patel, we are happy to present a personalized MG Hector to her for a pleasurable driving experience. #tokyoparalymics pic.twitter.com/MYwdnLHBI4
— Morris Garages India (@MGMotorIn) December 13, 2021
“मी एमजी मोटर व वडोदरा मॅरेथॉन यांच्या या भेटीचे कौतुक करते. ही पूर्णत: कस्टमाइज्ड हेक्टर माझ्या मालकीची असण्याचा खूप आनंद होत आहे. मी ड्रायव्हिंग सीटवर बसून या गाडीची क्षमता अनुभवण्यास खूपच उत्सुक आहे. ही गाडीमुळे स्वावलंबीपणा व सक्षमीकरणाची भावना मनात येते,” असे ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती भाविना पटेल म्हणाली.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “टोकियोमध्ये देशाचे नावलौकिक मोठे करणाऱ्या भाविना हिच्यासाठी आमची एमजी हेक्टर कस्टमाइज्ड करण्यात आली त्यामुळे अत्यंत सन्माननीय वाटत असून आम्ही त्यांच्या धैर्याला आणि निर्धाराला सलाम करतो. त्यांनी सर्व विषमतेवर मात करत संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. महिला सक्षमीकरणाप्रती त्यांचे योगदान अद्वितीय आहे.”