मुंबईचा बोरिवली ते ठाणे हा प्रवास आता तुम्हाला अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे. आश्चर्य वाटले ना. पण खरेच आहे.
पंधरा ते वीस मिनिटांनी वेगवान करण्यासाठी मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी येत्या दोन महिन्यांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून निविदा काढण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बोरिवली ते ठाणे दरम्यानचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठी मेट्रो ठरणार आहे. सध्या बोरिवलीला जाण्यासाठी घोडबंदर रोडचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र या मार्गावर अवजड वाहतूक असते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. मुंबईकरांना बोरिवली ते ठाणे प्रवास करण्यासाठी १ ते दीड तास लागतो. या नवीन प्रकल्पामुळे हे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.
हे ही वाचा
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’
रेल्वे गाड्यांनमधून पडून ४८७ प्रवाशांनी गमावले प्राण
११.८ किमी लांबीचा मार्ग
११.८ किमी लांबीची मेट्रो एमएमआरडीए संजय गांधी उद्यानाखाली बांधणार आहे. यासाठी सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. कंत्राटदाराची नियुक्ती केल्यानंतर या बोगद्याचे काम पाच वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती एमएमआरडीने दिली आहे.