मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!

आंध्र प्रदेश ते मुंबई हे १४०० किलोमीटरचे अंतर रस्त्याने कापल्यानंतर ती ट्रेन १० दिवसांत पोहोचेल.

मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!

मुंबईतील सर्व प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे ! कुलाबा-वांद्रे-सीप्झला जोडणारी मुंबई मेट्रो लाइन-३ साठी दुसरी ट्रेन अखेर तयार झाली आहे. ट्रेन आंध्र प्रदेशातील उत्पादन सुविधेतून बाहेर काढण्यात आली आहे आणि लवकरच मुंबईत दाखल होणार आहे.

आंध्र प्रदेश ते मुंबई हे १४०० किलोमीटरचे अंतर रस्त्याने कापल्यानंतर ती ट्रेन १० दिवसांत पोहोचेल. एका अहवालानुसार, आरे मेट्रो डेपोमध्ये ट्रेनच्या डिलिव्हरीनंतर, तिच्या डब्यांची जुळवणी केली जाईल आणि नंतर चाचणी धावण्याच्या ताफ्यात जोडली जाईल. ट्रेनच्या असेंब्लीला एकूण १५-२० दिवस लागतील. ट्रायल रन सध्या सारीपूत नगर, आरे आणि मरोळ नाका स्थानकांच्या मार्गावर चालवले जात आहेत. ताफ्यात नवीन ट्रेन जोडल्याने चाचणीच्या धावांना चालना मिळेल आणि नव्याने बांधलेल्या क्रॉसओव्हर ट्रॅकच्या अचूकतेची कल्पना येईल.

हे ही वाचा:

पदयात्रेच्या विश्रांतीदरम्यान राहुल गांधी जाणार का सुट्टीवर?

चेतन भगत सांगतात, भाजपाकडून शिकण्यासारख्या सहा गोष्टी ज्यात लपले आहे यशाचे रहस्य

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील ११ आरोपी तबलिगी जमातचे सदस्य

‘आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही, मात्र काही ठिकाणी षडयंत्र केले जाते’

सध्याचे क्रॉसओवर ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यावर मुंबई मेट्रो रेकी कॉर्पोरेशन (एमएमआरसी) चाचणीचा पट्टा सहार स्टेशनपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये, पहिला टप्पा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते सीप्झ पर्यंत नऊ डब्यांसह सुरू केला जाईल. बुधवार, २१ डिसेंबर रोजी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने पुष्टी केली की मेट्रो लाइन-३ ची प्रारंभिक ट्रेन चाचणी पूर्ण झाली आहे.

Exit mobile version