मेट्रो २अ, मेट्रो ७ ची चाचणी आज

मेट्रो २अ, मेट्रो ७ ची चाचणी आज

मुंबई हे शहरच गतीचं दुसरं नाव आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना संकटाने मुंबईची ही गती कमी केली. मात्र मुंबई आता पुन्हा धावण्यासाठी सज्ज होत आहे. मुंबईत आज मेट्रो २अ आणि मेट्रो ७ या मार्गांवर मेट्रोची चाचणी सुरु होणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांच्या प्रवासासाठी मेट्रो खुली होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या चाचणीला हिरवा कंदील दाखवतील.

मेट्रो २अ – डीएन नगर ते दहिसर

१८.६ किमी चा मार्ग – तरतूद ६,४१० कोटींची, २०३१ पर्यंत ९ लाख प्रवासी प्रवास करतील.

मेट्रो ७- अंधेरी ते दहिसर

१६.५ किमीचा मार्ग- तरतूद ६,२०८ कोटींची, २०३१ पर्यंत ६.७ लाख लोक प्रवास करतील.

या दोन मार्गांवर जी नवी मेट्रो धावताना दिसेल ती मेट्रो पूर्ण भारतीय बनावटीची आहे. शिवाय ही मेट्रो ड्रायव्हरलेस मेट्रो आहे. मुंबईच्या चारकोप डेपोमध्ये मेट्रो ७ आणि मेट्रो २अचं सध्याचं कारशेड आहे. याच ठिकाणाहून मेट्रोची पहिली फेरी केली जाईल.

मुंबईत चार ते साडेचार वर्षांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करणं हे आव्हानात्मक काम होतं. विशेषत: कोविड संकट आणि लॉकडाऊनमुळे मजुरांचं स्थलांतर हे या प्रकल्पातले मुख्य अडथळे ठरले.

हे ही वाचा:

दहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे नव्या थापा, नव्या बाता

बारावीच्या परीक्षांबाबत केंद्राकडे बोट

सात वर्षे स्वच्छतेची… मोदी है तो मुमकिन है

मुंबईत पश्चिम उपनगरांत प्रवास करताना सर्वात कठीण प्रवास असतो तो पश्चिम द्रुतगती मार्गावरचा. या मार्गावरुन प्रवास करणारे मुंबईकर दररोज आपल्या आयुष्याचे अनेक तास हे प्रवासात आणि वाहतूक कोंडीतच घालवतात. मात्र, नवी मेट्रो  मुंबईकरांची ही सर्वात मोठ्या समस्येपासून सुटका करेल.

कसे असतील तिकीट दर?

०-३ किमी -१० रुपये

३-१२ किमी – २० रुपये

१२-१८ किमी – ३० रुपये

१८-२४ किमी – ४० रुपये

२४-३० किमी – ५० रुपये

३०-३६ किमी – ६० रुपये

३६-४२ किमी – ७० रुपये

४२-४८ किमी – ८० रुपये

Exit mobile version