भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये तीन दिवसांत सुमारे ३० टक्के घट झाली आहे. पर्यटनाशी संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्यांनी हा दावा केला आहे. सोमवारी विविध संस्थांनी याबाबत माहिती दिली. ब्लू स्टार एअर ट्रॅव्हल सर्व्हिसेसचे संचालक माधव ओझा यांनी भारतातून मालदीवला जाणाऱ्या थेट विमानउड्डाणापैकी २० ते ३० टक्के तिकिटे रद्द झाल्याचे सांगितले. देशभरातून दररोज सात ते आठ टक्के विमाने मालदीवला जातात. त्यातील तीन विमाने एकट्या मुंबईतून जातात.
प्रतिदिन सुमारे १२०० ते १३०० पर्यटक मालदीवला जातील, एवढी या विमानउड्डाणांची क्षमता आहे.
ही तिकिटे रद्द होणे म्हणजेच प्रवासी आपल्या प्रवासाचा बेत बदलत आहेत, याचेच द्योतक आहे. सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन आदींनी केलेल्या आवाहनानंतर माधव यांनी बुकिंगच्या सध्याच्या आकडेवारीतही २० टक्के घट झाल्याचा अंदाज वर्तवला. अनेकजण नवीन पर्यटनस्थळांचा शोध घेत आहेत, असे माधव यांनी सांगितले. याचा फायदा लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबारला मिळेल. अन्य दुसरी आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळेही लोकप्रिय होऊ शकतील.
हे ही वाचा:
बंदुका घेऊन तोंडावर मास्क लावून थेट चॅनलच्या स्टुडिओत घुसले आणि…
अमेरिकेत राम मंदिराचा उत्साह; राम भक्तांनी काढली शोभायात्रा
बेंगळुरूस्थित सीईओ महिलेने आपल्या मुलाला मारून टाकत आत्महत्येचा केला प्रयत्न
विदेशात नोकरीचे अमिष दाखवून करीत होते फसवणूक
कंपनी देतेय १०० टक्के रिफंड
भारताच्या विरुद्ध मालदीवच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून नाराज झालेले अनेक प्रवासी मालदीवचा दौरा रद्द करत आहेत. पर्यटनसेवा देणाऱ्या थ्रिलोफिलिया कंपनीने प्रवाशांना १०० टक्के रिफंड देण्याचा निर्णय घेतला आहे.
मालदीवच्या १० पट सुंदर अंदमान
अंदमान निकोबार बेटांवरील टूर ऑपरेटर अध्यक्ष व भाजप नेते मोहन विनोद यांनी दावा केला की, मालदीवच्या तुलनेत अंदमान निकोबार १०पट सुंदर आणि स्वच्छ आहे.