बॉलीवूड अभिनेता सलमान खानला मागील आठवड्यात मिळालेल्या धमकी प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्याने माफी मागितली आहे. या प्रकरणी पोलीस शोध घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची नुकतीच हत्या झाली होती. त्यानंतर बाबा दिद्दीकिंच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. या प्रकरणानंतर अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, त्याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. कारण लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून सलमानला अनेक अनेक धमक्या आल्या आहेत.
हे ही वाचा :
गडचिरोलीत सुरक्षा पथकाची मोठी कारवाई; पाच नक्षलवादी ठार
गुजरातमध्ये दोन वेगवेगळ्या कारवाईत ४०० किलोहून अधिक ड्रग्ज जप्त!
समाजवादी खासदार राम गोपाल यादव यांनी सरन्यायाधीशांना वापरले अपशब्द
फारुख अब्दुल्लांना उशीरा सुचले शहाणपण; पाकिस्तानला सुनावले!
मागील आठवड्यात सलमान खानला अशीच एक धमकी मिळाली होती. मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सऍप मेसेजद्वारे धमकीचा संदेश देण्यात आला होता. धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले होते. सलमान खानला धमकी देणाऱ्याने ५ कोटी रुपयांची मागणी केली आणि जर पैसे दिले नाहीत तर बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट अवस्था होईल, असा इशारा दिला होता.
परंतु, धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आता सलमानची माफी मागितली आहे. मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सऍपवर पुन्हा एक दुसरा मेसेज आला आहे, ज्यामध्ये धमकी देणाऱ्याने माफी मागीतली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, ‘चुकून मेसेज गेला आणि त्याबद्दल माफी मागतो’. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन झारखंडमधील असल्याची माहिती आहे.