लोकसहभाग वाढवून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान यशस्वी करा!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

लोकसहभाग वाढवून ‘मेरी माटी मेरा देश’  अभियान यशस्वी करा!

स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनतेने या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले. बावनकुळे यांच्या हस्ते कुलाबा येथील कार्यक्रमात या अभियानाचा राज्यव्यापी प्रारंभ करण्यात आला . त्या प्रसंगी ते बोलत होते.

माध्यमांनी सामाजिक जाणिवा वाढवण्याचे कार्य करावे

उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबईत दाखल

झुरिच डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

केंद्र सरकारकडून ‘वन नेशन वन इलेक्शन’साठी समितीची स्थापना
बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाड्यावस्त्यांमधून ‘अमृत कलश यात्रा’ निघणार आहे. १५ सप्टेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे. अमृत कलशांमध्ये मूठभर माती, धान्य गोळा करून हे कलश ३१ आॅक्टोबर ला दिल्लीला अमृतवाटिकेच्या निर्माणासाठी नेले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ निर्माणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. अनेक कलशांमधून आणलेल्या माती आणि धान्याचे मिश्रण वापरून या अमृतवाटिकेचे निर्माण होणार आहे. ही ‘अमृत वाटिका’ देशातील सर्वात मोठे प्राथर्नास्थळ ठरणार असून अनेक देशी विदेशी पर्यटक इथे भेट देतील. हे संपूर्ण देशाचे अभियान असून त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही श्री . बावनकुळे यांनी नमूद केले.

Exit mobile version