पुरूष हॉकी संघाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून कौतूक

पुरूष हॉकी संघाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून कौतूक

सध्या चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरूष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत, कांस्यपदकाची कमाई केली आहे. त्याबद्दल देशभरातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. विविध नेत्यांकडून पुरूष हॉकी संघासाठी कौतूकास्पद ट्वीट केले गेले आहेत. यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि पियुष गोयल यांचादेखील समावेश आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुरूष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. या ट्वीटमध्ये राष्ट्रपतींनी भारताला हॉकी खेळाचे ऑलिम्पिक मधील पदक तब्बल ४१ वर्षांनी मिळणार असल्याबद्दल आनंद देखील व्यक्त केला आहे. त्यांनी या विजयाला ऐतिहासिक विजय देखील म्हटले आहे. त्याबरोबरच हा विजय देशातील तरुणांना प्रोत्साहित करेल अशी आशा देखील व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या विजयावर ट्वीट केले आहे. त्यांनी देखील या क्षणाला अभिमानाचा क्षण म्हटले आहे. त्याबरोबरच त्यांनी हा नवा भारत आहे, आत्मविश्वासाने भरलेला भारत आहे असेही म्हटले.

हे ही वाचा:

श्रीजेशची भिंत आणि भारताला हॉकीचे ऐतिहासिक ब्राँझ

प्रतिस्पर्धी कुस्तीगीर रविकुमारच्या दंडाचा चावा घेत राहिला, पण…

उपाहारगृहे, हॉटेलात ४ नंतर कोरोनाची भीती?

मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्याची धमक ठाकरे सरकारमध्ये नाही

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करताना प्रत्येक भारतीयासाठी कांस्यपदक विजयाचा हा क्षण अतिशय अभिमानाचा असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ट्वीट करताना, हॉकी संघाचे कांस्यपदक विजयासाठी अभिनंदन केले आहे. त्याबरोबरच हॉकी संघाचे प्रदर्शन अप्रतिम असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्वीटरवरून हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी देखील ४१ वर्षांनी हॉकी मधील पदकाची कमाई केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ४१ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. हा इतिहास रचला गेला आहे. त्यासोबतच त्यांनी देखील पुरूष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.

हॉकीमधील पदक हे ऑलिम्पिकमधील भारताचे चौथे पदक ठरणार आहे. भारताला यापूर्वी एक रौप्य आणि दोन कांस्य पदके मिळाली आहेत. त्याबरोबरच कुस्तीमध्ये देखील भारताला रवि कुमार दहिया याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

Exit mobile version