मनोहर पर्रिकरांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा

मनोहर पर्रिकरांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आज मुंबईतील विलेपार्लेमध्ये कोलडोंगरी मनपा दवाखान्याचे मनोहर पर्रीकर आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखाना असे नामकरण करण्यात येणार आहे. विलेपार्ल्याचे आमदार पराग आळवणी यांच्या हस्ते हे नामकरण केले जाणार आहे.

मनोहर पर्रिकर हे गोव्यातील भाजपाचे आजवरचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जातात. गोव्यामध्ये भाजपाला मोठं करण्यामध्ये मनोहर पर्रिकरांचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपचे राज्यातील पहिले सरकार हे यांच्याच नेतृत्वात स्थापन करण्यात आले होते. पर्रिकर हे गोव्यातील पणजीमधून १९९४ सालापासून आमदार होते. २००० ते २००५ या काळामध्ये पर्रिकर हे गोवा राज्याचे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यानंतर २०१२-१४ या काळात पुन्हा ते मुख्यमंत्री बनले. २०१४ ते २०१७ या काळात पर्रिकर यांना संरक्षण मंत्री बनवण्यात आले होते. त्यांच्याच काळात राफेल विमानांची खरेदी करण्यात आली होती.

हे ही वाचा:

अखेर परमबीर सिंह यांची हकालपट्टी

कुबेरगिरी, अर्थात निसटलेल्या लंगोटीची नैतिकता

शरद पवारांचे काँग्रेसला थेट आव्हान, तरीही आघाडीत सर्वकाही आलबेल?

या कार्यक्रमामध्ये मनोहर पर्रीकरांच्या आठवणींना त्यांचे निकटवर्तीय उजाळा देणार आहेत. भाजपाचे आमदार आणि मुंबई प्रदेशाचे भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर हे प्रमुख वक्ते असणार आहेत.

Exit mobile version