हिंदवी स्वराज्याचे रूपांतरण साम्राज्यात करणारे थोरले बाजीराव पेशवे यांचे एक भव्य स्मारक मध्य प्रदेशातील रावेरखेडी येथे होऊ घातले आहे. रावेरखेडी येथे बाजीराव पेशवा यांचे समाधी स्थळ होते. पण हे समाधी स्थळ आता पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे त्याच ठिकाणी आता बाजीराव पेशवे यांचे भव्य स्मारक उभे रहावे असे निर्देश देण्यात आले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी तसे आदेश मध्यप्रदेश सरकारला दिले असून यासाठी राज्यसभेचे खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी पाठपुरावा केला आहे.
रावेरखेडी येथे असलेले थोरले बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थळ हे एका धरण प्रकल्पाच्या अंतर्गत पाण्याखाली गेले. त्यामुळे रावरखेडी येथेच नर्मदा किनारी थोरले बाजीराव यांचे भव्य स्मारक उभे रहावे अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली होती. याचा पाठपुरावा राज्यसभा खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे हे सातत्याने करत होते. शुक्रवार, २५ जून रोजी डॉ. सहस्रबुद्धे यांनी थोरले बाजीराव पेशवे स्मारक समिती पदाधिकाऱ्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करत या प्रकल्पाचे महत्त्व बोलून दाखवले. तर त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तात्काळ या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
हे ही वाचा:
अवघ्या सहा दिवसात भारताने केले मलेशिया, कॅनडा, सौदीच्या लोकसंख्येइतके लसीकरण
मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ल्याच्या धमकीचा कॉल
गरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती!
शेती कायद्याविरोधातील आंदोलकांचा धुडगूस
तर थोरले बाजीराव पेशवे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यासोबत देशाचे चीफ ऑफ देफेन्स स्ताफ जनरल बिपिन रावत यांचीही भेट घेतली आहे. पुण्यातील खडकवासला येथे असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या आवारातही बाजीराव पेशव्यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. त्यासंदर्भात ही भेट झाली.
धन्य ते बाजीराव .धन्य ते सर्व जण जे या स्मारकासाठी प्रयत्न करीत आहेत.