पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणात हवा असलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. फरार भारतीय व्यापारी मेहुल चोक्सीला १२ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या तो कोठडीत आहे, अशी माहिती बेल्जियमच्या फेडरल पब्लिक सर्व्हिस ऑफ जस्टिसने सोमवारी (१४ एप्रिल) दिली. यासह भारताने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची विनंती केली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
तर त्याच्यासाठी कायदेशीर सल्लागार देखील पुरवला जाणार आहे, असे विभागाने सांगितले.
बेल्जियमच्या फेडरल पब्लिक सर्व्हिसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले, मेहुल चोक्सीला शनिवार (१२ एप्रिल) अटक करण्यात आली. पुढील न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत त्याला कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याला त्याच्या वकिलांशी बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत सरकारने चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी औपचारिक विनंती पाठवली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा :
केळी, ब्रोकली खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात
राम मंदिराच्या मुख्य शिखरावर कलश स्थापित
झारखंडचे मंत्री हफीजुल हसन म्हणतात, संविधानापेक्षा शरियत उच्च
“हिटमॅनचा सायलेंट मोड सुरूच आहे!”
दरम्यान, मेहुल चोक्सी प्रकरणातील पुढील सुनावणीसाठी भारतीय अधिकारी बेल्जियमला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. तो तुरुंगातच राहावा आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी ते आधीच कायदेशीर रणनीती तयार करत आहेत.
मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांच्यावर सरकारी पंजाब नॅशनल बँकेतून सुमारे १३,५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. हे आरोप समोर आल्यानंतर दोघेही देश सोडून पळून गेले. २०१८ मध्ये, चोक्सीने भारतातून पळ काढला आणि अँटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारले.