मुख्यमंत्री योगींचा शिरच्छेद करण्याची धमकी देणाऱ्या मेहजान उर्फ़ फैज़ला अटक!

बरेली पोलिसांची कारवाई

मुख्यमंत्री योगींचा शिरच्छेद करण्याची धमकी देणाऱ्या मेहजान उर्फ़ फैज़ला अटक!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची आणि महाकुंभ होऊ न देण्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या मेहजान उर्फ ​​फैजला उत्तर प्रदेशच्या बरेली पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू संघटनेच्या सदस्यांनी मेहजनवर कठोर कारवाईची मागणी केली होती. शनिवारी (११ जानेवारी ) पोलिसांनी त्याला बरेलीच्या लोको कॉलनीतून अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहजान रझाने शनिवारी त्याच्या फेसबुकवर दोन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले आणि त्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली. दुसऱ्या पोस्टमध्ये मेहजानने प्रभू रामाच्या आईला शिव्या देताना हे वर्ष अयोध्येतील त्यांच्या जन्मभूमीवर बांधलेल्या मंदिराचे शेवटचे वर्ष असल्याचे वर्णन केले होते.

या पोस्ट्सवर हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. यानंतर त्याला अटक करण्यात आली. मेहजान रझाला अटक केल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तो हात जोडून त्याच्या पोस्टबद्दल माफी मागत आहे. इथून पुढे अशी कोणतीही पोस्ट करणार नसल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

हे ही वाचा : 

प्रयागराजचा महाकुंभ: भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा एक उत्साही संगम!

राखेच्या टिप्परने घेतला सरपंचाचा बळी !

‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे

बहुप्रतीक्षित झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार !

 

Exit mobile version