जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती एका कार अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत.जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात मेहबुबा मुफ्ती यांच्या गाडीचा अपघात झाला.या दुर्घटनेत मेहबुबा मुफ्ती यांचा कार चालक जखमी झाला आहे.
मेहबुबा मुफ्ती गुरुवारी श्रीनगरहून अनंतनागला जात असताना अनंतनागच्या संगम बिजबेहराजवळ त्यांच्या कारला अपघात झाला.मेहबुबा मुफ्ती या आगीच्या दुर्घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी अनंतनागमधील खानबाल येथे जात होत्या.तेव्हा हा अपघात आला.या दुर्घटनेत मेहबुबा मुफ्ती याना कोणतीही झालेली नसून कार चालक जखमी झाल्याची माहिती आहे.मात्र, अपघातात ब्लॅक कलर स्कॉर्पिओकारचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.
हे ही वाचा:
लालकृष्ण अडवाणी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार
भारतीत पुरातत्त्व विभागाचे मोहम्मद म्हणतात, राममंदिर अनेक पटीने विशाल होते!
सीबीआयने नितीमत्ता समितीच्या अहवालाची प्रत मागवली
महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य; नवी मुंबई तिसरे स्वच्छ शहर!
दरम्यान, कार अपघातानंतर मेहबुबा दुसऱ्या वाहनाने अनंतनाग येथे रवाना झाल्या. मेहबुबा मुफ्ती यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरु केला आहे.कारचा अपघात कसा झाला याची अद्याप माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत अपघाताची माहिती दिली.तिने पोस्ट मध्ये लिहिले की, मेहबुबा मुफ्ती यांच्या कारला अपघात झाला, अनंतनागला जात असताना हा अपघात झाला.देवाच्या कृपेने मेहबुबा आणि त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.