‘माय होम इंडिया’कडून दिल्या जाणऱ्या ‘वन इंडिया ऍवॉर्ड’ची घोषणा झाली असून पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत आज पार पडणार आहे. मुंबईतील विलेपार्लेमधील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा पार पडणार आहे. ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
१४ वा ‘वन इंडिया ऍवॉर्ड २०२४’चा पुरस्कार वितरण सोहळा विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे पार पडणार आहे. सोमवार, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम असणार आहे. ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर यांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा :
दिल्लीतील ४० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; ३० हजार डॉलर्सची मागणी
मोहम्मद युनूस नोबेल पारितोषिकासाठी पात्र नाहीत, पुरस्कार काढून घ्या!
लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्याची दांडी का उडविली?
हा घ्या पुरावा… मारकडवाडीने कुणा एका पक्षाला पाठिंबा दिला नाही!
यंदाचा ‘वन इंडिया ऍवॉर्ड’ मेघालयचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विद्यानिष्ठ मारक यांना जाहीर झाला आहे. भाजपाच्या नेत्या माधवी लता यांच्या हस्ते डॉ. विद्यानिष्ठ मारक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रसयु ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक योगेश बेंडाळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. ‘माय होम इंडिया’चे ऑल इंडिया प्रेसिडेंट डॉ. हरीश शेट्टी आणि ‘माय होम इंडिया’चे महासचिव श्रावण झा हे उपस्थित असणार आहेत.