लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ‘मेगाब्लॉक’

प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे

लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ‘मेगाब्लॉक’

मुंबईची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकलच्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या रविवार १३ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक असणार आहेत. मात्र या प्रवाशांनी रेल्वे लोकलचे वेळापत्रक पाहून बाहेर पडावे, तसेच उद्या नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त वेळ लागण्याची शक्यता असून, प्रवासासाठी जास्तीचा वेळ शिल्लक ठेवावा.

उद्या मेगाब्लॉक उपनगरीय रेल्वे मार्गावरील मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अपअँड डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप-डाउन मार्गावर तसेच पश्चिम मार्गावरील वसई ते वैतरणा दरम्यान धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच यामध्ये पश्चिम मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तर उपनगरीय रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती तसेच, रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

नियोजित मेगाब्लॉक हा मध्य रेल्वे मार्गातील माटुंगा ते मुलुंड अप अँड डाउन जलद मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ०३:५५ वाजेपर्यत असणार आहे. लोकल गंतव्यस्थानी नियोजित वेळच्या १५ ते २० मिनिटे उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी हून कल्याण कल्याण, कसारा आणि खोपोली या मार्गावरील सर्व लोकल विलंबाने धावतील.

पश्चिम मार्गावरील वसई ते वैतरणा दरम्यान अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११:५० ते रविवारी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान ट्रेन क्र. १९१०९ विरार-भरूच मेमू विरारहून पहाटे ०४:३५ ऐवजी १५ मिनिटे विलंबाने म्हणजे ४:५० वाजता सुटेल. या व्यातिरिक्त रविवारी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल.

हे ही वाचा 

‘माझे तिकीट उद्धव ठाकरे यांनी कापले’

गोध्रा कटाच्या सूत्रधाराचा जामीन वाढविला

बेस्टमध्ये फुकट्या प्रवाशांचा सुळसुळाट

गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम, शिंदे गटात सामील

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक सकाळी ११:०५ ते सायंकाळी ०४:०५ वाजेपर्यंत असणार आहे. मेगाब्लॉक कालावधीमध्ये पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप मार्गावरुण सीएसएमटी येथून पनवेल / बेलापुर येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावर सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि ठाणे येथून पनवेल कडे जाणाऱ्या अप-डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. तसेच या दरम्यान खारकोपर आणि नेरळ/बेलापूर मार्गावर सर्व लोकल वेळापत्राकानूसार धावतील. तसेच रेल्वे प्रवाशांसाठी सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावणार आहेत.

Exit mobile version